Homeएनसर्कलसणासुदीच्या काळात देशांतर्गत...

सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमानांची अतिरिक्त उड्डाणे

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता देशांतर्गत विमानसेवा पुरविणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांनी या काळात शेकडो अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने काल हवाई प्रवास शुल्कविषयक आढावा घेतला. अनेक विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे न करता विमानसेवेच्या तिकीटदरात भरमसाठ वाढ करतात. त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत विमान कंपन्यांनी खालीलप्रमाणे अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  1. इंडिगो: 42 मार्गांवर सुमारे 730 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  2. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस: 20 मार्गांवर सुमारे 486 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  3. स्पाईसजेट: 38 मार्गांवर सुमारे 546 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांच्या दरांवर आणि विमानसेवा क्षमतेवर कठोर देखरेख ठेवणार आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content