Tuesday, January 14, 2025
Homeएनसर्कलप्रत्यक्ष ट्रेनिंग फिल्डवरच्या...

प्रत्यक्ष ट्रेनिंग फिल्डवरच्या अधिकाऱ्याकडूनच!

आपण सहाय्यक आयुक्त म्हणून जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष फिल्डवरील ट्रेनिंग विभागातील आयकर इन्स्पेक्टरकडूनच मिळाले. त्यामुळे नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांना खात्यामध्ये काम करण्याच्या संदर्भातील त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचे आदानप्रदान करावे, असे आवाहन नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांनी काल केले.

आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहायक आयुक्त यांच्या ‘उत्तरायण’ या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी नागपूरच्या छिंदवाडा रोडवरील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी एनएडीटी येथे त्या बोलत होत्या. याप्रसंगी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार, अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार तसेच ‘उत्तरायण’, या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगन आदी मान्यवर उपस्थित होते.

आयकर विभागात काम करत असताना आयकर अधिकाऱ्यांनी डिजीटली सक्षम राहणे आवश्यक असून आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट, सायबर फॉरेंसिक्स तसेच डिजिटल सबमिशन यासारख्या उपक्रमांमध्ये कौशल्य संपादन केल्यास ते करदात्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात स्वागतपर भाषण एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार यांनी केले. अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार यांनी याप्रसंगी नवपदोन्नत अधिकाऱ्यांना कर प्रशासकाची शपथ दिली. या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आकाश देवांगन यांनी सांगितले की, सात आठवड्यांपेक्षा जास्त चालणाऱ्या या ‘उत्तरायण’ प्रशिक्षणामध्ये नवपदोन्नत सहाय्यक आयुक्तांना आयकर प्रशासनाच्या सर्व बाबींवर प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वृद्‌धीकरीता तसेच करसंकलनात करचुकवेगिरीचा सामना करण्याचे प्रशिक्षण, मनी लॉन्ड्रिंग या  आर्थिक घोटाळ्यांसारख्या आर्थिक गुन्ह्याचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एक आठवड्याच्या भारत दर्शन कार्यक्रमाचादेखील समावेश असतो.

याप्रसंगी सहाय्यक प्रशिक्षण संचालक अरविंद कुमार वर्मा यांनी या तुकडीची माहिती दिली. या तुकडीत 131 अधिकारी प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी 38 महिला आहेत. या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची आहे. या तुकडीचे सरासरी वय 54 वर्षे असून या तुकडीतील  अधिकाऱ्यांनी सुमारे 20 ते 25 वर्षे सेवा आपल्या विभागात दिल्यानंतर त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहाय्यक प्रशिक्षण संचालक अभिनव मिश्रा यांनी केले. याप्रसंगी रीना त्रिपाठी यांनी एनएडीटी परिसरात वृक्षारोपणदेखील केले.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content