Skip to content
Monday, April 28, 2025
Homeकल्चर +अनुराधा पौडवाल यांची...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली.

श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपरिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले.

गणेश पंचरत्न हे श्री गणेशाची स्तुती करणारे एक उत्तम श्लोककाव्य आहे. काही महिन्यांपूर्वी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्यरचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गायले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य भाविकांना आता ऐकता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात संगीत रसिक आणि श्री गणेशभक्तांना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात पंचरत्न श्लोककाव्य ऐकण्याचा भाग्य योग लाभणार आहे. मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोककाव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी येणारे हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोककाव्य ऐकत होते. 

Continue reading

३ व ४ मेला अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा

येत्या ३ व ४ मे रोजी, सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत सुविद्या डिग्री कॉलेज, योजना‌ शाळा पटांगण, मागाठाणे बस डेपोजवळ, बोरीवली पूर्व, मुंबई याठिकाणी मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट...

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय... त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी घटस्फोट सोहळ्याचे एक अनोखे...

‘एकात्म मानवदर्शन’ तत्त्वाने साधता येईल विश्वकल्याणाचे उद्दिष्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पं. दीनदयाळ...