Homeकल्चर +मनाला गुंतवून ठेवणारं...

मनाला गुंतवून ठेवणारं कोवळं प्रेमगीत ‘झोका’ प्रदर्शित

प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचं एक हळवं गीत “झोका” आता प्रदर्शित झालंय. प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रित झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करतं.

हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर चित्रिकरण आहे. प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे. गायक-गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रेमातली ती पहिली झोक्याची क्षणं आठवायला लावतात. मराठीत अशा प्रकारचं दृश्य आणि भावनिक सादरीकरण खरंच कौतुकास्पद आहे. हे गाणं नव्या पिढीच्या प्रेमकथेचं एक सुंदर दर्शन घडवतं. ह्या गाण्याचे गायक राजेश्वरी पवार आणि ओंकारस्वरूप आहेत तर संगीतकारही ओंकारस्वरूप आहे, गीतकार सुहास मुंडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांचंच आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांनी भरलेला “सजना” हा सिनेमा येत्या २७ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content