Details
६ लाख विद्यार्थ्यांना बीआयसी सेलोचा कानमंत्र!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बीआयसी सेलो, या भारतातील आघाडीच्या राइटिंग इन्स्ट्रूमेंट कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘सेलो राइट-टू-विन’ शालेय उपक्रम सादर केला होता. अध्ययन व शिक्षणाप्रती अनुकूल वृत्तीला चालना देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. शैक्षणिक अभ्यासाचा ताण झपाट्याने एक सामाजिक समस्या बनत आहे. लहान मुलांना परीक्षेची चिंता भेडसावत आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करण्याचा आणि वर्गात अव्वल क्रमांक पटकावण्याचा दबाव टाकला जात आहे. शालेय परीक्षांमध्ये नापास होण्याचा ताण व भीतीचा अनेकदा मुलांच्या सामाजिक, भावनिक व शैक्षणिक यशावर दुष्परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्यामध्ये आणि परीक्षांदरम्यान येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करण्यासाठी ‘सेलो राइट-टू-विन’ उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाच्या सादरीकरणापासून उपक्रमाने भारतातील १,५०० शाळांमधील ६ लाख विद्यार्थ्यांना शिक्षित केले आहे.
या उपक्रमामध्ये दोन कार्यशाळा आहेत. शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रातील प्रमाणित हस्ताक्षर विश्लेषक व तज्ज्ञांच्या टीमने या कार्यशाळा विकसित केल्या आहेत. पहिली कार्यशाळा ‘सुंदर हस्ताक्षराचे रहस्य’मध्ये इयत्ता ४थी ते ६वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. हे सत्र त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेली तंत्रे शिकवतो आणि त्यांचे हस्ताक्षर सुधारतो, ज्यामुळे त्यांना पेन्सिल ते पेनापर्यंत लेखनामधील बदल सहजपणे आत्मसात करता येतो. दुसरी कार्यशाळा ‘तणावमुक्त परीक्षा’मध्ये इयत्ता ७वी ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सत्र विद्यार्थ्यांना चार संज्ञानात्मक तंत्रे शिकवतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची अध्ययन व स्मरण कौशल्ये वाढवण्यामध्ये मदत होते आणि ते परीक्षांसाठी उत्तम तयारी करण्यामध्ये सक्षम होतात. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना अचूकपणे व सुस्पष्ट लेखन गतीने करण्याचेदेखील प्रशिक्षण देते.
या उपक्रमाबाबत बोलताना बीआयसी सेलोचे डायरेक्टर मार्केटिंग इंडिया तन्वीर खान म्हणाले की, बीआयसी सेलोमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना परीक्षांदरम्यान सामना कराव्या लागणाऱ्या ताणाबाबत माहित आहे. या ताणावर मात करत शैक्षणिक सत्रामध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता विद्यार्थ्यांना आवश्यक तंत्रासह सक्षम करण्यासाठी ‘सेलो राइट-टू-विन’ उपक्रमाची रचना करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही हा उपक्रम सुरू ठेवत भारतभरातील इतर नवीन शाळांपर्यंत हा उपक्रम घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहोत.
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्समधील इयत्ता ९वीचा विद्यार्थी कुमार अभिषेक, त्याचा अनुभव सांगत म्हणाला की, ही सत्रे अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त आहेत. या सत्रांमधून आम्हाला पेन धरण्याच्या योग्य पद्धती समजल्या, ज्यामुळे आमचे हस्ताक्षर सुधारण्यामध्ये मदत झाली. या उपक्रमादरम्यान माइण्ड मॅप्ससारख्या अध्ययनतंत्रांचा वापर करत परीक्षा तणावमुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मी अभ्यासातील उत्तम यशासाठी या तंत्रांचा अवलंब करेन. माझ्यातील परीक्षेबाबत असलेली भीती दूर करत मला परीक्षेसाठी सुसज्ज करण्यासाठी सेलोचे आभार.
सेलोचा ‘राइट-टू-विन’ उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सर्वात योग्य असलेले पेन शोधण्यामध्ये मदत करतो. योग्य पेनाच्या वापराने आरामदायी व सुलभ लेखनाची खात्री मिळते, ज्यामुळे परीक्षांमधील ताण कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. बीआयसी सेलो, विद्यार्थ्यांना ताण कमी करत आणि परीक्षांसाठी सुसज्ज असण्यामध्ये मदत करत त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करते. कंपनीने गेल्या वर्षी एक जागरूकता मोहीम सादर केली. या मोहिमेने परीक्षांदरम्यान पालकांकडून विद्यार्थ्यांवर होणारा शैक्षणिक प्रगतीबाबतचा दबाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. ‘सरप्राईज टेस्ट’ व्हिडिओला ४० दशलक्ष व्ह्यूजसह भव्य यश मिळाले. या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांना पाठिंबा देण्याचे आणि परीक्षेच्या काळात त्यांच्यावरील दबाव कमी करण्याचे आवाहन करण्यात आले.”
“केएचएल न्यूज ब्युरो