HomeArchiveमारूती सुझुकीची डिझायर...

मारूती सुझुकीची डिझायर ठरली भारतातील दशकभरातील क्र.१ची सेदान

Details
मारूती सुझुकीची डिझायर ठरली भारतातील दशकभरातील क्र.१ची सेदान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मारूती सुझुकी इंडियाने आपला डिझायर ब्रँड १० वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वाधिक खपाचा कॉम्पॅक्ट सेदान ब्रँड असल्याची घोषणा नुकतीच केली. १९ लाखांहून अधिक ग्राहकांनी प्राधान्यक्रमाची गाडी म्हणून या गाडीची निवड केली आहे. २०१८-१९ मध्ये कंपनीने २.५ लाखांहून अधिक गाड्या विकल्या आहेत म्हणजेच दरमहा सरासरी २१००० गाड्या. बाजारपेठेतील ५५ टक्के वाट्यासह डिझायर या कॉम्पॅक्ट सेदान वर्गात आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये डिझायरच्या सुमारे ३०००० गाड्यांची विक्री झाली.

प्लश आणि रूमी इंटेरिअर देणारी अस्सल सेदान अशी ओळख असणाऱ्या या गाडीत नवी वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे, मे २०१७ मध्ये नवी डिझायर तत्काळ लोकप्रिय झाली. डीआरएल (डेटाइम रनिंग लॅम्स्मे ), सुयोग्य कट असलेली टू-टोन अलॉय व्हील्स, रीअर एसी वेंट्स आणि स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टिम (अँड्रॉईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी) अशा वैशिष्ट्यांमुळे या विभागात डिझायर ही अगदी मनपसंत गाडी ठरते.

डिझायरला इतके यशस्वी ठरवल्याबद्दल ग्राहकांचे आभार मानताना मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (वितरण आणि विक्री) कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, “मारूती सुझुकीच्या आजवरच्या प्रवासात डिझायर हा ब्रँड अत्यंत महत्त्वाचा वाटेकरी आहे. डिझायर सादर करून आम्ही नवा ‘कॉम्पॅक्ट सेदान’ हा विभाग निर्माण केला. हा विभाग सातत्याने विकसित आणि व्यापक होत आहे. या सर्व काळात मारूती सुझुकी डिझायरने या वाढीचे नेतृत्त्व केले आहे आणि आजही ती ग्राहकांना सुयोग्य व आकर्षक वाटते. डिझायरच्या तिसऱ्या आवृत्तीची विक्री सुमारे २० टक्क्यांनी वाढली यातून ग्राहकांशी असलेले दृढ नाते स्पष्ट होते.”

“आम्ही सतत आमच्या ग्राहकांच्या मागण्या लक्षपूर्वक ऐकतो आणि त्या आमच्या गाड्यांमधील वैशिष्ट्यांमध्ये बदलतो. अत्यंत लोकप्रिय अशी ऑटो गीअर शिफ्ट (एजीएस) टेक्नॉलॉजी डिझायरच्या सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सुमारे १३ टक्के ग्राहकांनी ऑटोमॅटिक प्रकाराला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, नव्या डिझायरच्या जवळपास ५० टक्के ग्राहकांसाठी कॉम्पॅक्ट सेदान ही त्यांची पहिली गाडी होती. गाडी बाळगणे सेदानपासून सुरू करण्यास तयार असलेल्या भारतीय ग्राहकांचा हा नवा कौल यातून दिसून येतो,” असे ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content