Details
यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जाहीर!
01-Jul-2019
”
राज्यात नऊ ठिकाणी विभागीय फेरींचे आयोजन
18 सप्टेंबरला मुंबईत अंतिम फेरी
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यातील कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विभागीय व अंतिम अशा दोन फेर्यांतमध्ये घेण्यात येणार असून राज्यातील नऊ विभागीय केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न होणार आहे. 18 सप्टेंबर 2019 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, चिपळूण, या नऊ शहरांमध्ये विभागीय फेरी पार पडणार आहे.
वक्ता दशसहस्त्रेषू असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्त्व कला आवश्यक आहे. त्यासाठीच अधिकाधिक वक्ते निर्माण होऊन, विविध विषयांवर सखोल वाचन आणि विचारमंथन होऊन सद्विचारांचा ओघ अखंड राहवा, या उद्द्येशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या विभागीय फेरीची सुरूवात औरंगाबाद येथे मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे. एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या चार जिल्ह्यांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. नाशिक येथे एच. पी. टी. कला व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या चार जिल्ह्यांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. पुणे येथे रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, 27 ऑगस्ट 2019 रोजी विभागीय फेरी पार पडणार आहे. पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. कोल्हापूर येथे गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 रोजी महावीर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय फेरी संपन्न होईल. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना येथे स्पर्धेत प्रवेश घेता येईल. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे शुक्रवार, 20 ऑगस्ट 2019 रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
मुंबई येथे रामनारायण रूईया स्वायत्त महाविद्यालयाच्या मराठी विभागासमवेत या स्पर्धेच्या विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार, 31 ऑगस्ट 2019 रोजी विभागीय फेरी संपन्न होईल. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. नांदेड येथे बुधवार, 4 सप्टेंबर 2019 रोजी पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. अमरावती येथे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 रोजी विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल. नागपूर येथे शनिवार, 7 सप्टेंबर 2019 रोजी युगांतर शिक्षण संस्थेच्या तिरपुडे सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल.
विभागीय फेरीसाठी स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे असणार आहेत. 1) भारतीय लोकशाही व निवडणूक व्यवस्था 2) यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द – शोध आणि बोध 3) महाराष्ट्राच्या महिला धोरणाची 25 वर्षे 4) जातींचं काय करायचं? व्यवस्थापक कि निर्मूलन? 5) सोशल मिडिया – मी आहे नेहमी ऑनलाईन!.
प्राथमिक फेरीतील प्रथम विजेत्यास रूपये पाच हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय विजेत्यास रूपये तीन हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय विजेत्यास रूपये दोन हजार व स्मृतिचिन्ह व उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना रूपये एक हजार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 18 सप्टेंबर 2019 रोजी रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई येथे संपन्न होणार आहे. अंतिम फेरीकरीता अनुक्रमे रूपये पंधरा हजार व स्मृतिचिन्ह, रूपये दहा हजार व स्मृतिचिन्ह, रूपये सात हजार व स्मृतिचिन्ह व रूपये तीन हजार व स्मृतिचिन्ह (दोन विजेते) अशी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाची पारितोषिके असणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरीता www.ycpmumbai.com या वेबसाईटवर अथवा [email protected] या मेल आयडीवर तसेच सुबोध – 8668591341, मनीषा -9022716913, रमेश- 9004652262 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक सुप्रिया सुळे, सरचिटणीस श. गं. काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले व नवमहाराष्ट्र अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने केले आहे.”
“राज्यात नऊ ठिकाणी विभागीय फेरींचे आयोजन