Details
आरोग्य व पर्यावरणात सकारात्मक बदलांसाठी ‘लेटस् रिव्हर्स इट’ मोहीम!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
जास्त वृक्षराजी असलेल्या भागातील नागरिकांना हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे विकार आणि मानसिक तणावाचा त्रास कमी होतो असे आता एका अमेरिकन अभ्यास प्रबंधाने सिद्ध करून दाखवले आहे. याच विचाराने आता आयुर्वेदिक उपचारांनी हृदयरोगाला आळा घालण्यासाठी प्रसिद्ध असलेली संस्था माधवबाग आणि सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराई संस्था एकत्र आले आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक हृदयरुग्णांवर उपचार केलेल्या माधवबागने हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब इ. आजारांवर केलेले संशोधन इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटीश जर्नल ऑफ मेडिसिन अॅन्ड मेडिकल रिसर्च अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रकाशनांमधून आणि लॅन्सेट, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लिनिकल अॅन्ड एक्सपेरिमेंटल कार्डिऑलॉजीसारख्या वैद्यकीय परिषदांमधून प्रसिद्ध झाले आहे. माधवबागमध्ये आजवर एक हजारहून अधिक मधुमेहींचा आजार रिव्हर्स झाला आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणार्या या विविध आजारांना सर्वांगीण व परिणामकारकपणे परतवण्यासाठी माधवबागने निदान, नियंत्रण, निवारण, नवजीवन या चिकित्साप्रणाली प्रचलित केल्या आहेत.
ठाणे येथील टिप टॉप प्लाझा येथे झालेल्या ’उडान 2019’ या कार्यक्रमामध्ये माधवबागचे संस्थापक व सी.ई.ओ. डॉ. रोहित माधव साने यांनी या चिकित्सा प्रणालींचे औपचारीक उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते. सयाजी शिंदे यांनी माधवबागच्या चिकित्सेचे स्वानुभवातून कौतुक केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये असलेले पर्यावरण व पाणीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी झाडे लावण्याचे व वाढवण्याचे महत्त्व विशद केले. माधवबागच्या देशभरात पसरलेल्या क्लिनिक्सच्या जाळ्याद्वारे वृक्षसंवर्धनाचा विचार जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. रोहित साने यांनी सयाजी शिंदे यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करणारे मानपत्र त्यांना प्रदान केले व पुढील वर्षभरात माधवबागमध्ये येणार्या सर्व रुग्णांमध्ये वनीकरणाविषयी जागरुकता व सजगता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉ. साने व सयाजी शिंदे यांनी ‘लेटस् रिव्हर्स इट’ या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन केले. माधवबागच्या 6 राज्यांमध्ये असलेल्या 190हून अधिक क्लिनिक्स आणि 2 रुग्णालयांद्वारे पुढील वर्षभरात पन्नास लाख नागरिक व रुग्णांमध्ये रोग परिवर्तत व वनीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यासाठी वर्षभर जनजागृतीचे विविध कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा यांचे आयोजन केले जाईल.
उडान 2019 कार्यक्रमाला गुजरात आयुर्वेद बोर्डचे सदस्य डॉ. सोनी, माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. गुरुदत्त अमीन आदी मान्यवर आणि माधवबागच्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इ. ठिकाणचे 600हून अधिक डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवबागचे सी.ओ.ओ. श्रीपाद उपासनी यांनी केले.”
“केएचएल न्यूज ब्युरो