Details
यंदाचा आरोग्यदायी संकल्प!
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
२०१९ सालातला दुसरा महिना संपत आला. पण म्हणून नवीन संकल्प करायचा नाही, असे नाही. नववर्षापासून करावयाचा संकल्प राहून गेला असला तरी आताही तो करता येतो. नवीन वर्षात आपले आरोग्य चांगले राहवे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र आजच्या धावपळीच्या जगात आरोग्याकडे आवश्यक तेव्हढे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हेदेखील तितकेच खरे आहे. चांगले आरोग्य आणि तंदुरूस्त असल्याशिवाय कोणतेही काम योग्यप्रकारे करता येत नाही. त्यासाठी या वर्षात तंदुरूस्त राहण्यासाठी आरोग्याकडे संपूर्ण लक्ष देण्याचा संकल्प सर्वांच्या दृष्टीने किफायतशीर आहे. संकल्प कोणते करावेत याविषयी आपण थोडक्यात पाहूया.
पाणी हा घटक प्रत्येक जीवासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहणे आवश्यक आहे. श्वासोच्छ्वासाइतकेच योग्य प्रमाणात पाणी पिणेही गरजेचे असते. बर्याचदा हिवाळ्यात, उन्हाळ्याच्या तुलनेत तहान कमी लागते. त्यामुळे पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. तसेच हिवाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे काही लोकांना त्रासही होतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी नियमितपणे 8-10 ग्लास पाण्याचे सेवन जरूर केले पाहिजे. त्याशिवाय आहारात पातळ पदार्थांचा समावेश केला पाहिजे. कोणत्याही ऋतुमानात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये.
त्यानंतर आहार, पथ्याहार किंवा डाएट हा सर्वच तरूणाईचा आवडीचा विषय आहे. डाएट करण्यामागे तंदुरूस्त राहणे किंवा वजन कमी करणे असे दोन उद्देश असतात. आहार नियंत्रणामुळे शरीराला खूप लवकर आकार येतो. पण त्यामुळे शरीराला त्रासही होतो. कारण डाएटिंग किंवा आहार नियंत्रणामुळे बर्याचदा शरीराला गरजेनुसार पौष्टिक घटक मिळत नाहीत. त्या घटकांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. स्वतःला तंदुरूस्त राखायचे असेल किंवा वजन घटवायचे असेल तर योग्य प्रमाणात पौष्टीक आहार घ्यायला सुरूवात करा. तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते व आजारांपासूनही बचाव होतो.
अतिवजन आरोग्यासाठी धोक्याची सूचना असते. त्यामुळे आहारात बदल घडवून आणावा लागेल, असे केल्यास वजन सहजपणे नियंत्रित करता येते. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्यावा. त्याशिवाय सकाळ-संध्याकाळ नियमित व्यायाम करावा. साखरेचेही नियंत्रित प्रमाणातील सेवन योग्य असते. मात्र, अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी बिघडते. त्यामुळे मधुमेह जडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे साखरेचे नियंत्रित सेवन करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता हा घटक खूप महत्त्वाचा आहे. घर व परिसराची स्वच्छता नीटनेटकी राखली तर आजार आपल्याभोवती घुटमळणार नाहीत. बहुतांश आजार हे संसर्गामुळे होत असतात. परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास आजारांपासून स्वरक्षण करता येणे शक्य असते. तसेच स्वतःची शारीरिक स्वच्छताही महत्त्वाची असते.
यंदाच्या वर्षाच्या संकल्पांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान यांच्यापासूनही दूर राहण्याचा संकल्प करा. या दोन्ही सवयी आजारांचे व मनस्वास्थ्य बिघडण्याला कारणीभूत ठरू शकतात. धूम्रपान आणि मद्यपान सोडल्यास हृदयाचे विकार होण्याचा धोका 40 टक्क्यांहून कमी असतो. तंदुरूस्तीसाठी नियमित व्यायामाचे महत्त्व वेगळे सांगायला नको. तंदुरूस्त आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. हृदयाबरोबरच शरीराच्या अनेक अवयवांचे आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन किमान तीस मिनिटे व्यायाम पुरेसा ठरतो. स्वतःवरील निरनिराळ्या प्रकृती अस्वास्थ्यावर स्वतःच उपचार करण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही स्वयंचिकित्सा घातकदेखील ठरू शकते. त्यामुळे आजारपण आल्यास स्वयंचिकित्सा करून औषधे घेऊ नका. बर्याच लोकांना स्वमर्जीने औषध घ्यायची सवय असते. अगदी लहानात लहान आजार असला तरीही डॉक्टराचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण लहान आजाराचे स्वरूप कधीही मोठे होऊ शकते. आजारांचे निदान योग्य वेळीच होणे आवश्यक असते. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. शरीरात अनेक रोग घर करू शकतात. हे रोग जेव्हा गंभीर पातळीपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांचे निदान होते. आरोग्यप्रती थोडी जागरूकता प्रत्येकाने बाळगली तर या आजारांना प्राथमिक पातळीवर ओळखून त्यावर उपाय करता येऊ शकतात. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी. या वर्षात आरोग्य तपासणीचा संकल्पही अवश्य करावा. या वर्षात आपणा सर्वांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहवे यासाठी शुभकामना!”
“वैभव मोहन पाटील