HomeArchiveकॅन्सरवरील उपचारांना आयुर्वेदीय...

कॅन्सरवरील उपचारांना आयुर्वेदीय चिकित्सा पध्दतीची जोड फायदेशीर!

Details
कॅन्सरवरील उपचारांना आयुर्वेदीय चिकित्सा पध्दतीची जोड फायदेशीर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बदलती जीवनशैली, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता व रोगप्रतिकारशक्तीचा अभाव यासह इतर अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरचे निदान झाल्यावर अनेकजण खचून जातात. पण योग्य उपचारांमुळे कॅन्सरवर मात करता येते. आधुनिक उपचार पध्दतीच्या जोडीनेच आयुर्वेदीय चिकित्सेच्या माध्यमातून रूग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणा करण्यास मदत करण्याचे काम भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित आयुर्वेद रूग्णालय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून पुण्यातील वाघोलीमध्ये सुरू आहे.

परमपूज्य प्र. के. सरदेशमुख महाराजांच्या प्रेरणेने १९९४ पासून वाघोली व सोलापूरमध्ये कॅन्सर संशोधन केंद्राचे काम सुरू आहे. बायोप्सीने कॅन्सरचे निदान निश्चित झाल्यावर रूग्णाचा या प्रकल्पात समावेश केला जातो. आजपर्यंत या प्रकल्पात असंख्य कॅन्सरग्रस्त रूग्णांनी आयुर्वेदीय चिकित्सेचा फायदा घेतला आहे. कॅन्सरग्रस्त रूग्णांना वाघोलीमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा, कौन्सिलिंगच्या जोडीला केमोथेरेपी, रेडिओथेरेपी, शस्त्रक्रिया अशा आधुनिक चिकित्सा पध्दती तसेच कॅन्सर निदानाच्या तपासण्या एकाच छत्राखाली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी वाघोली येथील रूग्णालयात मे २०१० पासून इंडिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर सुरू झाले आहे.

कॅन्सरवर इंटिग्रेटेड दृष्टिकोनातून उपचार करणारे देशातील हे वैशिष्टपूर्ण केंद्र आहे. यात कॅन्सरसाठी अद्ययावत कोबाल्ट रेडिएशन सेंटर सुरू करण्यासाठी केंद्राच्या ऑटोमिक एनर्जी विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात आले. या सेंटरमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी केंद्राच्याच डिपार्टमेंट आँफ आयुषने सेंटर आँफ एक्सलन्स योजनेअंतर्गत निधी दिला आहे. टाटा उद्योग समुहाचे सर्वोसर्वा रतन टाटा यांनी कॅन्सर रूग्णांसाठी पंचकर्म हॉस्पिटलच्या इमारतीसाठी सहकार्य केले आहे.

देश विदेशातून रूग्णांचा ओढा

वाघोलीत कॅन्सर संशोधन प्रकल्पाचे १६० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र आहे. या प्रकल्पात रूग्णांना देण्यात येणारी औषधे संस्थेच्याच अथर्व हेल्थकेअर कंपनीत तयार केली जातात. राज्यातील तसेच देशातील रूग्णांना या चिकित्सेचा लाभ घेता यावा यासाठी पुण्यातील वाघोलीसह मुंबई, सोलापूर, नवी मुंबई, दिल्ली, कोल्हापूर व नाशिकमध्ये कॅन्सर संशोधन प्रकल्पाचे काम सुरू आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी या केंद्रांत देशातूनच नव्हे तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांमधून रूग्ण आयुर्वेदीय चिकित्सेबरोबरच पंचकर्म चिकित्सेसाठी येतात.

आयुष्याची गुणवत्ता सुधारते

आमच्या प्रकल्पातील आयुर्वेदीय चिकित्सेने कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे आमचे म्हणणे नाही. पण, या चिकित्सेने रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढते व आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रूग्ण आपले दैनंदिन कामकाज चांगल्याप्रकारे करू शकतात असे बहुतांश रूग्णांमध्ये दिसून आले आहे. केमोथेरेपी, रेडिओथेरेपीमुळे उदभवणारे त्रास आयुर्वेदीय चिकित्सेने चांगल्याप्रकारे कमी होतात व रूग्ण केमोथेरेपी व रेडिओथेरेपी अपेक्षित कालमर्यादेत पूर्ण करू शकतात असे अनेक रूग्णांमध्ये आढळून आल्याचे या सेंटरचे संचालक डाँ. स. प्र. सरदेशमुख सांगतात. या प्रकल्पात बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिएशन आँन्कॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, प्रसिध्द कॅन्सर सर्जन डॉ. शिरीष कुमठेकर हे समन्वयक म्हणून काम करतात.

कॅन्सर संशोधनासाठी देणगीदारांना आवाहन

या सेंटरमध्ये संशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. कारण वाघोली येथील इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटरमध्ये गरजू कॅन्सर रूग्णांची मोफत व माफक दरात चिकित्सा केमोथेरेपी, रेडिओथेरेपी, आयुर्वेदिक चिकित्सा, पंचकर्म, आहार चिकित्सा व कॅन्सरवर संशोधन केले जाते. देणगीदारांना आयकरात ३५ (१) (ii) व ८० जी अंतर्गत करसवलतीचा फायदा मिळेल. संपर्क- ९१२० ६७३४६००० किंवा ९५४५५०८८९० किंवा www.ayurved-for-cancer.org किंवा [email protected]”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content