HomeArchiveसावध ऐका हृदयाच्या...

सावध ऐका हृदयाच्या हाका!

Details
सावध ऐका हृदयाच्या हाका!

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विनोद साळवी..
  
 
हृदयी वसंत फुलताना.. हे हृदयाविषयीचे आपले अपार, प्रेम आणि भाव आहेत. या हृदयाचे ठोके बंद पडले की माणूस नावाचं यंत्र थांबलंच. मग, तुम्ही-आम्ही कितीही पाषाणहृदयी असलो तरीही. आज बदलत्या जीवनशैलीत आपलं हृदय जपणं, सांभाळणं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. आपल्या लाईफलाईनची मुदत किती याच अंदाज कुणालाच नाही. मानसिक ताणतणावाची दैनंदिनी आपणच लिहित असतो. आपल्या तरूण भारताचंही असंच काहीसं झालं आहे. इथे आरोग्य भीषण समस्या बनली असून गरीब असो वा श्रीमंत, शहरी असो वा ग्रामीण सर्वांना दुखणं सारखचं. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची गाडी बिघडत असल्याचा अनुभव प्रत्येकजण कथन करतो. पण, आता चाळीशीच्या आत अगदी १८व्या वर्षीही कमजोर हृदयाने दगा द्यावा, हे वास्तव.

 
आण्या-नाण्यांच्या अन् रूपये लाखांच्या जमान्यात मानवी गरजा कमी होत्या अन् आयुष्याचा सेन्सेक्स वाढीव होता. परंतु, आता खरबो-अरबोपतींच्या जमान्यात माणूस धनदौलतीने लाख संपन्न असला तरी त्याला आरोग्याचं बघून मोजकाच घास खावा लागत आहे. या बदलत्या जीवनशैलीने वयाचं अर्धशतक झळकावणंही आजच्या काळात फार मोठी मजल मानावी. कारण आपल्या देशात ५० टक्के लोक हृदयविकाराच्या झटक्याने आपली लाईफलाईन गमावतात. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या हैदराबाद येथील एका संवाद कार्यक्रमात हृदयविकाराविषयक अनेक गोष्टींवर असाच प्रकाशझोत टाकण्यात आला. आपल्या तरूण भारतात ज्या वयात आजी-आजोबांकडून अनुभवाचे चार बोल ऐकण्याचं वय असतं त्या वयात ती व्यक्ती वार्धक्याकडे झुकलेल्या आजी-आजोबांसमवेत आपल्या अशक्त हृदयावर उपचार घेते. अगदी तिशीतच आपल्या हृदयाचं डामाडोल सुरू व्हावं. काल-परवा हसतखेळत दिसणारा माणूस दुसर्यार दिवशी मृत्यूशय्येवर झोपलेलं पाहवं. यावरून भारतीयांना हृदय व काळजाची किती बारीक काळजी वर्तमानात अन् भविष्यात घ्यावी, याचा अंदाज यावा.
 
 
आपल्या देशात ४० टक्के लोकांना हृदयासंबंधी आजारांनी ग्रासले आहे तेही अगदी वयाच्या पन्नाशीत. हाय बीपी, शूगर, कॉलेस्ट्रॉल या सर्व तक्रारींचं दर चार-सहा महिन्यांनी येणारं रिपोर्ट कार्ड पाहून हृदयाची धडधड आणखीनच वाढावी. हे हार्ट फेल्युअर म्हणजे काय बुवा, हा प्रश्न हृदयाला फुलासारखं जपणार्या प्रत्येकाला पडावा. रक्तपुरवठा, ऑक्सिजन आणि हृदयाच्या हालचाली यात काही तरी बिघाड होतो म्हणे. पहिला झटका, दुसरा झटका आणि तिसरा झटका या मृत्यूच्या पायर्यांघचं मोजमाप करावं. ज्यांना हृदयासंबंधी विकार आहे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यास लागलीच उपाय योजावेत, हेच लाईफलाईन वाढवण्याचे साधन. खेळणं-रांगणं, हुंदडणं, बागडणं हा काहींच्या बाल्यावस्थेतील आनंदाचा क्षण. पण, हे दिवस झुलायचे अन् झोपळ्यावर बसून डुलायचे असले तरी त्याच दिवसांत आपल्या पाल्याच्या हातात आलेलं मोबाइलरूपी खेळणं पाहता त्याचंही हृदय जपा, काळजी घ्या, हे तज्ज्ञ डॉक्टर आग्रहाने सांगत आहेत. शाळा, क्लास, टीव्ही, मोबाईल गेम्स यात अडकून पडलेल्या आपल्या पाल्याला आपणच बाहेर काढावं. दिवसातून किमान तासभर तरी त्याला मैदानी खेळात रमू द्यावं, हा सल्ला डॉक्टरांचा. 
 
 

 

 
आजघडीला आपल्या आणि मुलांच्या जीवनातील खेळाचं महत्त्व बर्यााच अंशी घटलं आहे. घर-कार्यालय-बस-बाईक-कार यातून चढउतार करून आपण एका बैठ्या अन् झोपाळू जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. अगदी आपल्या मुलांबाबत शाळेत दाखल करताना ही शाळा मुलांकडून चांगला अभ्यास करवून घेते, या गुणांवर भाळतो. परंतु, आपल्या पाल्याच्या मनाची व शरीराची मशागत खेळून-रांगून व्हावी, हे आपण का दुर्लक्षित करावं? बदलत्या जीवनशैलीत लहान असो वा थोर किती चालण्यात, खेळण्यात किती सक्रीय आहे, याचा लेखाजोखा आपण प्रत्येकाने घ्यावा, हा निर्वाणीचा सल्ला तज्ज्ञ देतच असतात. अन् सावध ऐका हृदयाच्या हाका! हे गणित आपल्या जीवनशैलीत पाळावे हेही सांगतात. अगदी सिगारेट, दारू हे ताणतणावावर मात करण्यासाठी काहींसाठी जालीम उपाय आहेत. आज आपल्या देशात ८ ते १० लाख लोकांना हृदयविकाराने ग्रासल्याचे आकडेवारी सांगते. आता आपणच बदललेलं हे जीवनचक्र, दिनमान भेदण्याचं, बदलण्याचं काम आपण नाही तर कोण करणार?”

 

 
 
विनोद साळवी..
  
 
“हृदयी वसंत फुलताना.. हे हृदयाविषयीचे आपले अपार, प्रेम आणि भाव आहेत. या हृदयाचे ठोके बंद पडले की माणूस नावाचं यंत्र थांबलंच. मग, तुम्ही-आम्ही कितीही पाषाणहृदयी असलो तरीही. आज बदलत्या जीवनशैलीत आपलं हृदय जपणं, सांभाळणं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. आपल्या लाईफलाईनची मुदत किती याच अंदाज कुणालाच नाही. मानसिक ताणतणावाची दैनंदिनी आपणच लिहित असतो. आपल्या तरूण भारताचंही असंच काहीसं झालं आहे. इथे आरोग्य भीषण समस्या बनली असून गरीब असो वा श्रीमंत, शहरी असो वा ग्रामीण सर्वांना दुखणं सारखचं. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची गाडी बिघडत असल्याचा अनुभव प्रत्येकजण कथन करतो. पण, आता चाळीशीच्या आत अगदी १८व्या वर्षीही कमजोर हृदयाने दगा द्यावा, हे वास्तव.”

 
“आण्या-नाण्यांच्या अन् रूपये लाखांच्या जमान्यात मानवी गरजा कमी होत्या अन् आयुष्याचा सेन्सेक्स वाढीव होता. परंतु, आता खरबो-अरबोपतींच्या जमान्यात माणूस धनदौलतीने लाख संपन्न असला तरी त्याला आरोग्याचं बघून मोजकाच घास खावा लागत आहे. या बदलत्या जीवनशैलीने वयाचं अर्धशतक झळकावणंही आजच्या काळात फार मोठी मजल मानावी. कारण आपल्या देशात ५० टक्के लोक हृदयविकाराच्या झटक्याने आपली लाईफलाईन गमावतात. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या हैदराबाद येथील एका संवाद कार्यक्रमात हृदयविकाराविषयक अनेक गोष्टींवर असाच प्रकाशझोत टाकण्यात आला. आपल्या तरूण भारतात ज्या वयात आजी-आजोबांकडून अनुभवाचे चार बोल ऐकण्याचं वय असतं त्या वयात ती व्यक्ती वार्धक्याकडे झुकलेल्या आजी-आजोबांसमवेत आपल्या अशक्त हृदयावर उपचार घेते. अगदी तिशीतच आपल्या हृदयाचं डामाडोल सुरू व्हावं. काल-परवा हसतखेळत दिसणारा माणूस दुसर्यार दिवशी मृत्यूशय्येवर झोपलेलं पाहवं. यावरून भारतीयांना हृदय व काळजाची किती बारीक काळजी वर्तमानात अन् भविष्यात घ्यावी, याचा अंदाज यावा.”
 
 
“आपल्या देशात ४० टक्के लोकांना हृदयासंबंधी आजारांनी ग्रासले आहे तेही अगदी वयाच्या पन्नाशीत. हाय बीपी, शूगर, कॉलेस्ट्रॉल या सर्व तक्रारींचं दर चार-सहा महिन्यांनी येणारं रिपोर्ट कार्ड पाहून हृदयाची धडधड आणखीनच वाढावी. हे हार्ट फेल्युअर म्हणजे काय बुवा, हा प्रश्न हृदयाला फुलासारखं जपणार्या प्रत्येकाला पडावा. रक्तपुरवठा, ऑक्सिजन आणि हृदयाच्या हालचाली यात काही तरी बिघाड होतो म्हणे. पहिला झटका, दुसरा झटका आणि तिसरा झटका या मृत्यूच्या पायर्यांघचं मोजमाप करावं. ज्यांना हृदयासंबंधी विकार आहे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यास लागलीच उपाय योजावेत, हेच लाईफलाईन वाढवण्याचे साधन. खेळणं-रांगणं, हुंदडणं, बागडणं हा काहींच्या बाल्यावस्थेतील आनंदाचा क्षण. पण, हे दिवस झुलायचे अन् झोपळ्यावर बसून डुलायचे असले तरी त्याच दिवसांत आपल्या पाल्याच्या हातात आलेलं मोबाइलरूपी खेळणं पाहता त्याचंही हृदय जपा, काळजी घ्या, हे तज्ज्ञ डॉक्टर आग्रहाने सांगत आहेत. शाळा, क्लास, टीव्ही, मोबाईल गेम्स यात अडकून पडलेल्या आपल्या पाल्याला आपणच बाहेर काढावं. दिवसातून किमान तासभर तरी त्याला मैदानी खेळात रमू द्यावं, हा सल्ला डॉक्टरांचा. ”
 
 

 

 
“आजघडीला आपल्या आणि मुलांच्या जीवनातील खेळाचं महत्त्व बर्यााच अंशी घटलं आहे. घर-कार्यालय-बस-बाईक-कार यातून चढउतार करून आपण एका बैठ्या अन् झोपाळू जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. अगदी आपल्या मुलांबाबत शाळेत दाखल करताना ही शाळा मुलांकडून चांगला अभ्यास करवून घेते, या गुणांवर भाळतो. परंतु, आपल्या पाल्याच्या मनाची व शरीराची मशागत खेळून-रांगून व्हावी, हे आपण का दुर्लक्षित करावं? बदलत्या जीवनशैलीत लहान असो वा थोर किती चालण्यात, खेळण्यात किती सक्रीय आहे, याचा लेखाजोखा आपण प्रत्येकाने घ्यावा, हा निर्वाणीचा सल्ला तज्ज्ञ देतच असतात. अन् सावध ऐका हृदयाच्या हाका! हे गणित आपल्या जीवनशैलीत पाळावे हेही सांगतात. अगदी सिगारेट, दारू हे ताणतणावावर मात करण्यासाठी काहींसाठी जालीम उपाय आहेत. आज आपल्या देशात ८ ते १० लाख लोकांना हृदयविकाराने ग्रासल्याचे आकडेवारी सांगते. आता आपणच बदललेलं हे जीवनचक्र, दिनमान भेदण्याचं, बदलण्याचं काम आपण नाही तर कोण करणार?”

हृदयमानसिक ताणतणावजीवनशैलीहाय बीपीशूगरकॉलेस्ट्रॉलहार्ट फेल्युअरसिगारेटदारू

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content