Details
भावी मुख्यमंत्री!
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, त्यामुळेच आमची माती झाली’ असे भावुक होऊन कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधूनमधून सिंचन शिंपडत असल्याने सध्या त्यांच्या टारगट स्वभावाला त्यांनी स्वतःहून मुरड घातली आहे. पण कार्यकर्त्यांना कोण समजून सांगणार? भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणू नका, ही साद घातल्यानंतर स्वर्गात इंद्रदेवही हादरले. याचा अर्थ इंद्रदेवालाही दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा असावी. त्यामुळेच त्यांनी नारदाला आदेश दिला, पृथ्वीतलावर जाऊन दादा असे का रूसून बसलेत आणि भावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कोण आहेत, याचीही माहिती घेण्याचे आदेश दिले.
‘नारायण, नारायण…’ करीत, नारद दादांच्या प्रथम घरी गेले… दादा घरातल्या घरात फेऱ्या मारत होते. नारदाला पाहून ‘हे झेंगट कशाला आलं आता?’ मनात असं म्हणत, ‘काय, राव? काय काम काढलं? आणि अचानक!… बालक, असं नाही बोलायचं? आलेल्यांना प्रथम बसायला सांगायचं! मी भावी मुख्यमंत्री आहे (दादांना त्यांची चूक लक्षात आली आणि जीभ चावून) बसा, बसा काय काम काढलंय? आणि अचानक? इंद्रदेव म्हणतात, ‘दादा का रूसून बसलेत ते जरा पाहून या, नारदाने स्पष्टीकरण करत आपली वीणा बाजूला ठेवली.
‘मी कशाला रूसून बसू, मी काय बाई आहे का?’… दादा वैतागूनच बोलले.
‘भावी मुख्यमंत्री म्हणू नका,’ असे आपण विधान केल्याने आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असा अर्थ होतो आणि तुमची ताई सुप्रियाला मार्ग मोकळा करून दिला असाही अर्थ निघतो.
हे पहा तुम्ही पत्रकार मला काही स्वस्थ बसू देणार नाही. आता सत्ता नसूनही टीआरपी वाढविण्यासाठी तुम्ही माझा वापर करतायेत. मला यावर जास्त काय बोलायचं नाही. चहा-नाश्ता घ्या आणि माझी सुटका करा….’
ऐन थंडीतही दादांचा पारा चढलेला पाहून नारदमुनी नारायण, नारायण करीत वर्षा बंगल्यावर जातात.
मुख्यमंत्र्यांना निरोप जाताच ते स्वतः नारदमुनींचे स्वागत करायला प्रवेशद्वारावर जातात. (वाकून त्यांचा पदस्पर्श करतात आणि त्यांना केबिनमध्ये घेऊन येतात…)
मुख्यमंत्री- काय सेवा करू आपली?
नारद- नारायण, नारायण…, एक माहिती घेण्यासाठी आलोय… स्वर्गलोकात त्यावर चर्चा आहे. दादांनी भावी मुख्यमंत्री म्हणू नका म्हणून ताकीद दिली आहे, त्यासंदर्भात…
मुख्यमंत्री- कोण दादा? त्या कोल्हापूर पैलवानची ही हिंमत…?
नारद- मी चांद्रकांतदादांबद्दल बोलत नाही तर राष्ट्रवादीच्या अजितदादांविषयी बोलतोय…
मुख्यमंत्री- (पुढ्यातला पाण्याचा ग्लासमधील पाणी पीत…) आलं लक्षात, हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे… आमचं सरकार पुन्हा येणार याची जाणीव झाली त्यांना…!
नारद- नारायण, नारायण… म्हणजे तुम्हीच पुन्हा मुख्यमंत्री तर… (एवढ्यात दुधाचा ग्लास पुढ्यात ठेवला शिपायाने आणि नारद दूध पिऊन ग्लास ठेवतात…) येतो मी देवेंद्रजी…
नारद- (मातोश्रीवर पोहोचतात… सुरक्षारक्षक नारदाची वीणा उलटसुलट करत, आत काय आहे का ते बघतात…) अरे, बाबांनो मी नारद आहे. नेहमी इथे येतो… मला कोणी असं कधी अडवले नाही?
सुरक्षारक्षक- हे पाहा, आमचे उद्धवसाहेब भावी मुख्यमंत्री आहेत. तर, आतापासून त्यांनी मुख्यमंत्री असल्यासारखी तपासणी करायला सांगितले आहे, समजलं.
(तपासणी झाल्यानंतर नारदांना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले जाते…)
नारद- नारायण, नारायण… काय हो तुमच्याकडे कडक पहारा?
उद्धव- काय सांगू नारदमुनी तुम्हाला? मी जे बोलतो ते करून दाखवतो, हे माहित आहेच तुम्हाला… यापुढे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं मी घोषणा दिल्यानंतर सैनिक कामाला लागलेत. आमच्या ठाकरे कुटुंबात कोणीही कोणते सत्तेचे पद घेतले नाही. त्यामुळे सगळ्यांचा हट्ट एकच, भावी मुख्यमंत्री मीच असावा…
नारद- व्वाss… म्हणून आतापासून ही तयारी… तर, मी काय म्हणत होतो.. ज्या कामासाठी मी आलो होतो त्याच मला उत्तर मिळाले… म्हणजे भावी मुख्यमंत्री तुम्हीच. अजितदादा नाही तर.. (उद्धव गालातल्या गालात हसतात आणि ‘श्रीराम’ म्हणत त्यांचा निरोप घेतात…)
नारदाला राज ठाकरेंची आठवण येते आणि ते `कृष्णकुंज’वर जातात…
नारदाने राज यांच्या घरात पाऊल ठेवताच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो. कोण आलं, म्हणून राज बाहेर येतात.. नारदाला पाहून त्यांचा हात धरून (शरद पवारांचा हात धरल्यासारखे) त्यांना सोफ्यावर बसवतात…
राज- काय घेणार? गरम का थंड?
नारद- मुंबईत थंडी आहे, गरमच द्या…
राज- व्हिस्की घ्या… थंडी कमी होईल…
नारद- शिव, शिव, शिव…
राज- आता शिवसेनेचं नाव कशाला?
नारद- नाही हो, असलं काही नाही…
राज- तुमच्या स्वर्गात अप्सरा नाचतात तेव्हा मदिरा घेता ना… का मंदिरात असता?
नारद- नको, नको… मी जातो, शिव, शिव… (शिव, शिव नाव घेत नारद दरवाजातून बाहेर पडताच राज जोराने दरवाजा बंद करतात)
नारद सेनाभवनाच्या सिग्नलजवळ येत असताना रामदास आठवले एअरपोर्टवर जाण्यासाठी निघत असतात. त्यांची गाडी सिग्नलजवळ थांबते. आठवलेंना पाहून.. नारायण, नारायण बोलत नारद त्यांच्या गाडी जवळ जातात…
आठवले- हे पाहा नारदमुनी, माझं नाव रामदास आहे. नारायण राणेंचं नाव कशाला घेता? ते सध्या कोठेच नाहीत… नावालाच स्वाभिमान, राष्ट्रवादी आहेत.
नारद- अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला की ते चिडतात…
आठवले- चिडणारच… अहो, मी पवार साहेबांना सांगितलं होतं की एनडीएमध्ये या म्हणून… ऐकलं नाही.. म्हणून तर दादा कोणत्याही गोष्टीवर चिडतात…
बघा.. नारदमुनी तुम्हाला एका चारोळी ऐकवतोय…
स्वर्गात तुमचे देव इंद्र
आमच्याकडे नरेंद्र अन् देवेंद्र
विरोधकांना झाला यांचा ताप
पुढील वर्षी आम्हीच यांचे बाप!
आठवलेंनी बाप काढल्याबरोबर नारदाच्या हातातील वीणा खाली पडली आणि तेवढ्यात ग्रीन सिग्नल पडल्याने आठवलेंची गाडी सुसाट निघून जाते.
नारदाला कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही.. म्हणून ते सुप्रियाताईंकडे जातात…
सुप्रिया- या… या… आज कसं येणं केलं, आमच्याकडे?
नारद- काय झालं आणि काय सांगू? तुमच्या दादांनी मला कामाला लावलं..
सुप्रिया- दादांनी? काहीच तरी बोलू नका? दादा आता फार समंजस झालेत.
नारद- तसं नाही, त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. भावी मुख्यमंत्री म्हणू नका.. त्यामुळेच आमची माती झाली… याचा अर्थ ते मुख्यमंत्री स्पर्धेतून बाहेर पडले असा अर्थ निघतो… म्हणून…
सुप्रिया- तसं काही नाही, प्रत्येकाचं स्वप्न असतं… दादाला भावी, भावी म्हणून तो भावूक झालाय… त्याला एकदा संधी होती मुख्यमंत्री होण्याची. पण, बाबांच्या मनात वेगळे काय तरी होतं आणि त्याची संधी गेली… यंदाच्या भाऊबीजेला ‘मी लक्षात राहील अशी भाऊबीज तुला देईन’ असं मला म्हणाला होता… कदाचित मला मुख्यमंत्री करण्याचे त्याचे स्वप्न असेल. हे तुमच्यापुरती लक्षात ठेवा. गावभर सांगत बसू नका आणि थांबा, एक मिनिट… मला तुमच्याबरोबर सेल्फी काढू द्या… (नेहमीच्या सवयीप्रमाणे सुप्रियाताई सेल्फी काढतात)
नारद- नाही.. कोणाला काही सांगणार नाही, फक्त इंद्रदेवालाच सांगीन…(नारायण, नारायण करत नारद स्वर्गाकडे प्रयाण करतात…)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार