HomeArchiveमहिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे...

महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक – अमृता फडणवीस

Details
महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक – अमृता फडणवीस

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
‘स्वच्छ स्वच्छतागृह′ ही महिलांची मूलभूत गरज आणि अधिकार आहे. आज स्त्रिया कामासाठी, शाळेसाठी घराबाहेर जात असतात. त्यांच्यासाठी स्वच्छ स्वच्छतागृह जागोजागी उपलब्ध असणे नितांत गरजेचे आहे. त्याच्या अभावामुळे स्त्रियांना अनेक आजार, किडनीचे आजार होतात. म्हणूनच देशाच्या प्रगतीसाठी महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. मुंबईत जेथे जागा उपलब्ध असेल तिथे महिलांसाठी स्वछतागृहे उभारण्यासाठी पुढाकार घेऊ’, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले.

आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नाने, दहिसर चेकनाका या मुंबईच्या प्रवेशद्वारावर फक्त महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वातानुकूलित स्वछतागृह आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्थानिक महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या. समस्त महिला वर्गाची मूलभूत गरज लक्षात घेऊन, प्रयत्नपूर्वक स्वछ आणि वतानुकूलीत स्वछतागृह उभारल्याबद्दल प्रवीण दरेकर यांचे त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, जनहितार्थ स्वछतागृह उभारताना सर्वात मोठा अडथळा येतो तो परवानग्यांचा. परवानग्या मिळाल्या तर मुंबईच्या मुलुंड आणि वाशी प्रवेशद्वारावरही फक्त महिलांसाठी स्वच्छ व वातानुकूलित स्वछतागृह उभारू. निधीची कमतरता नाही पण परवानग्या मिळत नाहीत. त्यासाठी आपण मदत करावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात अमृता फडणवीस यांना केले. राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना मूलभूत सुविधा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.

यासंदर्भात बोलताना अमृता फडणवीस यांनी, ‘महिलांच्या मूलभूत गरजेसाठी परवानग्यांचा अडथळा येत असेल, तर हा अडथळा दूर करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत लढा देऊ. पण महिलांचा मूलभूत हक्क मिळवून देऊ,’ असे आश्वासन दिले.

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्याच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्र नंबर वनवर आहे. राज्यात हे अभियान 90 % राबविले गेले आहे. या अभियानात स्वछतागृह असणे निकडीचे आहे. तेव्हा महिलांसाठी स्वछतागृह उभारून उर्वरित 10 % अभियान यशस्वी करूया,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अदिवासी पाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न

यावेळी त्यांनी राष्ट्रीय उद्यानातील अदिवासी पाड्याच्या व वनजमिनीवरील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तेथील महिलांना स्वछतागृह, वीज, स्वछ पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी हा विषय आपण मुख्यमंत्र्यांकडे लावून धरू, असेही आश्वासन दिले. तसेच रिक्षा चालक, शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या महिला संस्था, स्थानिक महिलांच्या विविध विषयांवरील निवेदने स्वीकारली. त्यांच्या समस्या सोडवण्याचेही आश्वासन दिले.

महिलांच्या समस्याची जाण – प्राची पाठक

स्वछतागृह नसल्याने महिला प्रवासाला निघताना कमी पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लांबचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या या महिलांच्या समस्यांची जाण ठेऊन प्रवेशद्वारावर असे स्वच्छ स्वच्छतागृह आमदार दरेकर यांनी उभारले. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशीच स्वछतागृहे मुंबईत सर्वत्र उभारणे गरजेचे आहे, असे उदगार पत्रकार प्राची पाठक यांनी यावेळी काढले. मुंबईत महिलांना स्वच्छ स्वछतागृहाचा अभावावर प्राची पाठक यांनी वृत्तपत्रात लेख लिहून लक्ष वेधले होते. आमदार प्रवीण दरेकर यांनी त्याची दखल देऊन अंमलबजावणी केली. त्याबद्दल पाहुण्यांनी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमात हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, आरपीआयचे रमेश गायकवाड, गीता नलावडे यांची भाषणे झाली. निशा परुळेकर यांनी प्रभावी सूत्रसंचलन केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content