HomeArchiveआपल्याकडे हेमंतअप्पा तर...

आपल्याकडे हेमंतअप्पा तर पलीकडे फक्त गप्पा – उद्धव ठाकरे

Details
आपल्याकडे हेमंतअप्पा तर पलीकडे फक्त गप्पा – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भगवी वज्रमूठ पाहिल्यावर आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी उभे राहील असे मला वाटत नाही. आपल्याकडे हेमंत आप्पा आहेत आणि पलीकडे फक्त गप्पा आहेत. देव, देश आणि धर्मासाठी आपण युती केली आहे. अपक्ष फक्त मते फोडण्यासाठी उभे आहेत. बाजारबुणगे हातामध्ये भगवा घेऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.

शिवसेनाप्रमुखांना कशासाठी अटक करायला निघाले होता तुम्ही? शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याची हिंमत कोणालाही नव्हती. देश अस्थिर होत होता म्हणून शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात जाऊन हजर राहिले. १९९२ आणि १९९३ साली मुंबईला वाचण्याचा गुन्हा केला का त्यांनी? काँग्रेसवाले आपल्याला विचारत आहेत लाज वाटते का? 50 ते 60 वर्षे तुम्ही देशाला ओरबाडलं तेव्हा तुम्हाला लाज वाटली का? भाजप आणि आमच्यात मतभेद होते. ५० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज पेरलं ते आज हिंदुत्व म्हणून उभे आहे. तो भगवा ध्वज आज विरोधकांना पाहवत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसवाल्यांचा पंतप्रधानपदासाठी एकामेकांना मध्ये वाद आहेत. बिनचेहऱ्याची ही आघाडी आहे. काही झालं तरी युतीचा पंतप्रधान नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे. 2014 च्या आधी नेहमी घोटाळे. ए टू झेड घोटाळ्यांची यादी आहे. घोटाळ्यांमध्ये सुद्धा आदर्श. शेण घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा. अशी घोटाळ्यांची यादी आहे. हे करताना तुम्हाला लाज वाटली नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

शरद पवार कधी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटले नाहीत. त्यांनी राहुल गांधी यांनादेखील दगा दिला होता. हे कालचे पोर, याला काय राजकारण कळतं, असे ते म्हणाले होते. मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे पवार म्हणाले होते. कुठे गेला हिमालय? कुठे गेले ते काळे तोंड, असा सवालही त्यांनी केला.

पाकिस्तान नकाशावर राहणार नाही – संजय राऊत

नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान होतील तेव्हा लाहोर आणि कराचीमध्ये सुद्धा राम मंदिर बांधू. पाकिस्तान नकाशावर राहणार नाही. आपल्या सर्वांना या देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये द्यायचे आहे. इथले गुंड या मातीमध्ये गाडायचे आहेत आणि हेमंत गोडसे यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

हेमंत गोडसे जमिनीवरचा माणूस – गिरीश महाजन

या सभेमध्ये महिलांची संख्या कौतुकास्पद आहे. हेमंत गोडसे साधा सरळ सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि जमिनीवरचा माणूस आहे. समीर भुजबळ यांची जेलयात्रा आणि त्यांचे कारनामे हे जनतेला सांगण्याची गरज नाही. पाच वर्षांत बहुतांश योजनांचा लाभ नाशिककरांना मिळाला आहे. याचे एकमेव कारण हेमंत गोडसे, अशा शब्दांत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नदीजोड प्रकल्प राबवला – हेमंत गोडसे

आपण गेल्या पाच वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला आहे. सिन्नरमध्ये पाणी उपलब्ध करून दिले आहे. रेल्वे आणि महामार्ग यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू, असे हेमंत गोडसे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content