HomeArchiveराहुल शेवाळे यांनी...

राहुल शेवाळे यांनी केला मुंबई लोकलने प्रवास!

Details
राहुल शेवाळे यांनी केला मुंबई लोकलने प्रवास!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी लोकल रेल्वेने प्रवास करून प्रवाशांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. वडाळा ते मानखुर्द या प्रवासात शेवाळे यांनी प्रवाशांना रेल्वेच्या कामांची माहिती दिली आणि सुरक्षित प्रवासासाठी मतदानानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे वडाळा येथील एक बैठक आटोपून वडाळा रेल्वेस्थानकावर पोहोचले. तिकीट खिडकीवर जाऊन मानखुर्द स्थानकापर्यंतचे तिकीट त्यांनी खरेदी केले. यावेळी स्थानकावरील प्रवाशांनी शेवाळे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत हस्तांदोलन केले. त्यानंतर 12.24 वाजताच्या पनवेल लोकलमधून त्यांनी प्रवास सुरू केला. या प्रवासात शेवाळे यांनी 5 वर्षांत ‘रेल्वे समिती सदस्य’ या नात्याने केलेल्या कामांची माहिती प्रवाशांना दिली आणि 29 एप्रिलला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

वडाळा येथे सुरू झालेला हा प्रवास मानखुर्द येथे संपला. यावेळी शेवाळे यांच्यासोबत माजी महापौर श्रद्धा जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रेल्वे समिती सदस्य या नात्याने रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली. सर्व स्थानकांवर सरकते जिने, वॉटर कुलर, प्लॅटफॉर्मची वाढवलेली उंची अशा अनेक सुविधा गेल्या 5 वर्षांत केल्या. तसेच पनवेल-सीएसटी एलिव्हेटेड कॉरिडॉर, एमयुटीपी आशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई लोकलचा चेहरा बदलणार आहे. आज प्रवाशांना हीच माहिती देऊन त्यांना 29 तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले, असे शेवाळे यांनी नंतर सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content