HomeArchiveउच्च-तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश...

उच्च-तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवा : निरंजन डावखरे

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवावी, अशी आग्रही मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी उच्च-तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया खाजगी संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत होती. मात्र, या कंपनीच्या सर्व्हरवरील भार वाढल्यामुळे प्रक्रिया संथ होत होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या प्रकारांमुळे सदोष माहितीच्या आधारावर गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर अन्याय होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश नियामक प्राधिकरणाने नोंदणीला स्थगिती दिली. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उच्च-तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी निवेदन दिले.

या प्रवेशप्रक्रियेबाबत उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाला परिपूर्ण तांत्रिक माहिती आहे. तसेच यापूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया संचालनालयाकडून पार पाडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सोपविणेच योग्य ठरेल, असे डावखरे यांनी निवेदनात म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content