Details
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ईशा कोपीकर मैदानात!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वहातूकदार मालक आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या मागण्यासाठी सीनेअभिनेत्री आणि भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या कार्याध्यक्षा इशा कोपीकर आणि वाहतूक नेते तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख मैदानात उतरले असून बुधवारी त्यांनी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत शिष्टमंडळात माजी आमदार मंगेश सांगळे, नवभारतीय शिववाहतक संघटनेचे कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे, महिला सरचिटणीस मदिना शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनातून प्रमाणित वजनापेक्षा जास्त मालाची वाहतूक सुरू असून परिणामी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे याविरोधात कारवाईसाठी फिरते तपासणी भरारी पथक यंत्रणा नेमण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वाहनचालकांच्या पासिंगबाबत ऑनलाईन प्रणाली अस्तित्तस आली असून बर्या्चदा वेळ न मिळाल्याने विना पासिंग वाहने रस्त्यावर फिरत असतात. फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे वाहनांचा अपघात झाल्यास त्यांना विमा रक्कम मिळणार नाही. यासंबंधी काही तरतूद करण्यात आली आहे का? असल्यास तशा प्रकारच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत का? याची दखल परिवहन विभागाने घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीपेड टॅक्सी सेवेच्या धर्तीवर प्रीपेड रिक्षा प्रवासी सेवाही सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. ओला आणि उबर प्रवासी वाहने या शेअर टॅक्सीप्रमाणे प्रवासी वाहतूक कशी करू शकतात? सदर शेअरिंग प्रवासी भाडेपद्धतीवर निर्बंध घालण्यात यावा. मॉल, शाळा-महाविद्यालय, रूग्णालये या परिसरात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंग यांना मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. विमानतळ परिसर व रेल्वेस्थानक परिसरात प्रीपेड, शेअरिंग रिक्षा, टॅक्सी वाहनतळ चालविण्यास महिला संघटनेला प्राधान्य आणि मान्यता द्यावी. सर्व परिवहन कार्यालयात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना शासन फी दरात कामे करून द्यावीत, अशा मागण्या शिष्टमंडळाने परिवहन आयुक्तांसमोर मांडल्या.
ऑटोरिक्षा-टॅक्सी वाहनांवर जाहिरात करण्यासंदर्भात अधिकृत परवानगी देण्यात यावी, रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना वाहनावर हिरवी पाटी आणि घरी जाताना लाल रंगाची पाटी लावेल, अशी तरतूद करण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना वाहन पकडताना ते फायदेशीर ठरेल आणि रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात नाहक वाद होणार नाहीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरी भागात रिक्षा व टॅक्सी शेअर सेवा वाहनतळांची संख्या वाढविण्यात यावी. वाहनचालकाच्या दृष्टीदोषांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता सर्व परिवहन कार्यालयात अनुज्ञप्ती पत्र देताना उमेदवाराची डोळे तपासणी करणे अनिवार्य करावे. त्याकरीता आवश्यक डोळे तपासणी यंत्रणा, मशिनरी या परिवहन कार्यालयातच उपलब्ध कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
ओला आणि उबर वाहनचालकांना गणवेश बंधनकारक करण्यात यावा तसेच त्याचे आसनामागे स्वतःचे विस्तृत माहिती असणारे ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात यावे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारी करण्यासाठी जशी प्रणाली अस्तित्त्वात आहे त्याच धर्तीवर ओला-उबरसारख्या खासगी प्रवासी वाहनांच्या संदर्भातील तक्रारीसाठी प्रणाली अस्तित्त्वात आणावी. न्यायालयाचे आदेश असूनही प्रवासी बसेस वाहनांमधून सरार्सपणे मालवाहतूक सुरू आहे त्यावर त्यांनी खेद व्यक्त केला. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मालवाहतूक करणार्याव या वाहतूकदारांविरोधात तातडीने कारवाईची मोहीम राबवून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रमाणित वजनापेक्षा जास्त (ओव्हरलोड) कचरा वाहणार्यात कचरागाडी, डेब्रिज वाहणारी डम्पर वाहने यामुळे होणार्यात रस्त्यांची दुरवस्था याबाबत उपयायोजना करण्यात याव्यात, वाहतूक विषयासंदर्भात गांभीर्याने विचार करून येत्या दोन दिवसांत रस्त्यावर कार्यवाही दिसेल असे ठोस आश्वासन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी यानंतर दिले.”
“केएचएल न्यूज ब्युरो