HomeArchiveभाजपा कार्यकारी समितीच्या...

भाजपा कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरली निवडणुकीची दिशा!

Details
भाजपा कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरली निवडणुकीची दिशा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव डॉ. सरोज पांडे आणि राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश यांनी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सहभागी होण्याचे निर्देश दिले.

मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकत्र येण्यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्त्वात भाजपा देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात पक्षाला बळकटी मिळाली आहे. म्हणूनच आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता संपादन करणार आहोत. परंतु प्रत्येक स्तरावर जबाबदारीने काम केल्यानेच ही सत्ता संपादन करणे शक्य होणार आहे.”

मुंबईच्या वसंत स्मृती भवन, दादर येथे रविवारच्या सायंकाळी आयोजित या बैठकीत पक्षाच्या महासचिव डॉ. सरोज पांडे यांनी खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे लक्ष्य निश्चित करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश म्हणाले की, “पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाला सत्तेत आणण्याचा संकल्प पक्षाने घ्यावा. कार्यकारी समितीच्या बैठकीत नवनियुक्त मंत्री आशिष शेलार आणि योगेश सागर तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचे स्वागत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले. भाजपचे सदस्यता अभियान, युवा शक्ती अभियान आणि शक्ती सन्मान अभियान कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि या तीन कार्यक्रमांच्या संचालनाचा तपशील जिल्हास्तरावर घेण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात १ ऑगस्टपासून सुरू होणारी ‘महाजनादेश’ यात्रा यशस्वी करण्यासाठी बूथस्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीत मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना आणि युवा मोर्चाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा आणि सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीचे सूत्रसंचालन नगरसेवक सुनील यादव यांनी केले. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content