HomeArchiveमच्छिमारांचे प्रश्न सोडवण्याची...

मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्याची पंतप्रधानांकडे मागणी

Details
मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्याची पंतप्रधानांकडे मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
देशातील मच्छिमारांचे विविध ज्वलंत प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांच्यासमवेत गेलेल्या मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांच्या लोकसभेच्या कार्यालयात मच्छिमारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत मच्छिमारांना एनसीडीसी योजने अंतर्गत कर्ज व व्याजमाफी मिळावी, डिझेल सबसिडीची बी.पी.एल. अट शिथील करून मच्छिमारांना प्रति लिटर ५ रूपये डिझेल सबसिडी देण्यात यावी, देशातील मासेमारी बंदरे आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात यावीत, याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.

गेल्या 24 फेब्रुवारीला मच्छिमारांना आश्वासन दिल्याप्रमाणे केंद्रातील कृषी खात्यातून स्वतंत्र मत्स्य व्यवसाय खाते निर्माण करून देशातील मच्छिमारांना मोठा दिलासा देऊन स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर मच्छिमारांसाठी अच्छे दिन आणल्याबद्दल यावेळी पंतप्रधानांचे खासदार गावीत यांनी आभार मानले, असेही संधे म्हणाले.

या बैठकीत खासदार राजेंद्र गावित, रामदास संधे, गुजरातचे खासदार राजेश चुडासमा, सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मेहेर, गुजरात राज्य फिशरीज बोर्डचे अध्यक्ष वेलजीभाई मसानी आदी मान्यवर सहभागी झाले होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content