Details
मिठी नदीकिनारी राहणाऱ्यांच्या मदतीला धावले नसीम खान
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खालच्या आणि मिठी नदीकिनारी राहणाऱ्या विभागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. अशाप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भरपावसात पाणी भरलेल्या विभागाची पाहणी करत लोकांना मदत करताना आमदार मोहम्मद आरिफ (नसीम) खान दिसत होते.
अतिवृष्टीमुळे क्रांती नगर बैलबझार, इंदिरा नगर जरीमरी आणि पवई येथील शंकर नगर हा विभाग जास्त प्रभावित झाला. त्यामुळे तेथील हजारो परिवारांना जवळच्या शाळेमध्ये आश्रय घ्यावा लागला. पुढील संभाव्य हानी टाळण्याकरिता एनडीआरएफच्या दोन तुकड्या लाईफसेव्हिंग बोटीसह बैलबाझार येथील मिठी नदीवर तैनात करण्यात आल्या आहेत. नसीम खान यांनी येथील बेघर-आश्रित लोकांच्या खाण्या-पिण्याची व चादरीची व्यवस्था करून दिल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला.
”
“केएचएल न्यूज ब्युरो