Details
78 पदवीधरांचा गुणगौरव!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत शिवसेना व युवासेना शाखा क्र. ५९ च्या वतीने विभागातील ७८ पदवीधरांचा गुणगौरव सन्मान सोहळा यारी रोड येथील चिल्ड्रन वेलफेअर स्कूलमध्ये नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर व वर्सोवा विधानसभा संघटक व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे, चिल्ड्रन वेलफेअर शाळेचे प्राचार्य अजय कौल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, युवासेना कार्यकरणी सदस्य शीतल देवरूखकर, वाहतूक सेना सरचिटणीस साजीद सुपारीवाला, महिला विधानसभा समन्वयक शीतल सावंत, महिला उपविभाग संघटक जागृती भानजी, स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, युवासेना विभाग अधिकारी मोहित पेडणेकर व सर्व वर्सोवा विधानसभेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व युवासैनिक, शिवसैनिक व ७८ सत्कारमूर्ती त्यांच्या पालकांसोबत उपस्थित होते.
या सोहळ्यास मार्गदर्शन करताना अमोल कीर्तिकर यांनी पदवी घेतल्यानंतर पुढील करिअर संदर्भात सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सराव परिक्षेत मुंबई विभागातून अनुक्रमे ८ व १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पूनम रेवणकर, अमृता सतीश परब या ५९ प्रभागातील पदवीधरांचा विशेष सन्मान करण्यात आला व त्यांना युपीएससीच्या परीक्षेतसुद्धा चांगले यश मिळो यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.”
“केएचएल न्यूज ब्युरो