Details
आमदार नरेंद्र मेहतांकडून विविध विकासकामांचा शुभारंभ
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भाईंदर पश्चिमेच्या मूर्धागाव येथील बामण देव नगरमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते नुकताच झाला. स्थानिक नगरसेविका नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, नगरसेवक जयेश भोईर व शेकडो रहिवासी यावेळी उपस्थित होते. ब्रम्हदेव मंदिर, गांधीनगर, येथील रस्त्याच्या व गटाराच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. इतर मान्यवरांसोबतच नगरसेवक विनोद म्हात्रे, गणेश शेट्टी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाईंदर पश्चिमेच्या राई गांव येथील स्मशानभूमीच्या रस्त्याचे दुरूस्तीकरण व गटाराच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी रस्त्याची व गटारांची पाहणी करण्यात आली. साहिब श्री गुरू नानकदेव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आमदार मेहता यांनी मीरा रोड येथील बालाजी हॉटेल चौकामध्ये तिचे स्वागत करून दर्शन घेतले.
”
“केएचएल न्यूज ब्युरो