HomeArchiveअंधेरीच्या राजाची आज...

अंधेरीच्या राजाची आज भव्य विसर्जन मिरवणूक!

Details
अंधेरीच्या राजाची आज भव्य विसर्जन मिरवणूक!

    17-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह अनेक गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती.
 
आज मंगळवार दि. १७ रोजी आंगारकी संतष्टी चतुर्थीचा दुर्मीळ योग आला आहे आणि आजच या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक निघत आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक व मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.
 
 
आज संध्याकाळी ६ वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल. त्यानंतर सुमारे १५०००हून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघेल. आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस. व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवनमार्गे वेसावे समुदकिनारी दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. १८ रोजी दुपारी पोहोचेल. त्यानंतर दिवंगत नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबियांनी अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर दुपारी २ वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून भावपूर्ण निरोप देतील असेही ते म्हणाले.
 
१९७३ साली येथील आझाद नगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ देत म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला आणि कारखाने परत सुरू झाले. त्यामुळे १९७४पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला सायंकाळी विसर्जनाची मिरवणूक निघते. या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात येते. महिला ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळतात तर अनेक गणेशभक्त अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडतात. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेशभक्तांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूर करतात. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधव दिवाळीत आपला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतात, अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली.
 
 
दरवर्षी हुबेहूब देखावे साकार करणाऱ्या या समितीने यंदा उज्जैन येथील महाकलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकार केली होती. येथील देखावा व विशेष करून अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अशी माहिती समितीचे सचिव विजय सावंत व उदय सालीयन यांनी दिली.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह अनेक गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती.

 
“आज मंगळवार दि. १७ रोजी आंगारकी संतष्टी चतुर्थीचा दुर्मीळ योग आला आहे आणि आजच या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक निघत आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक व मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.”
 
 
“आज संध्याकाळी ६ वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल. त्यानंतर सुमारे १५०००हून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघेल. आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस. व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवनमार्गे वेसावे समुदकिनारी दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. १८ रोजी दुपारी पोहोचेल. त्यानंतर दिवंगत नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबियांनी अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर दुपारी २ वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून भावपूर्ण निरोप देतील असेही ते म्हणाले.”

 
“१९७३ साली येथील आझाद नगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ देत म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला आणि कारखाने परत सुरू झाले. त्यामुळे १९७४पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला सायंकाळी विसर्जनाची मिरवणूक निघते. या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात येते. महिला ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळतात तर अनेक गणेशभक्त अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडतात. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेशभक्तांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूर करतात. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधव दिवाळीत आपला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतात, अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली.”
 
 
दरवर्षी हुबेहूब देखावे साकार करणाऱ्या या समितीने यंदा उज्जैन येथील महाकलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकार केली होती. येथील देखावा व विशेष करून अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अशी माहिती समितीचे सचिव विजय सावंत व उदय सालीयन यांनी दिली.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content