HomeArchiveतांडा सुधार समितीच्या...

तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Details
तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन, नागपूरमध्ये नुकतेच मोठ्या दिमाखात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमदास महाराज वलोनीकर होते. संमेलनाचे उद्घाटन श्याम गुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजनकरी/शाहीरांनी समाजात प्रबोधन करताना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्त्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे. संत सेवाभाया यांचे विचार विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांच्या प्रबोधनाने झाले पाहिजे. त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी/शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.

मुख्य संयोजक नामा बंजारा यांनीदेखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींनादेखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

उदघाटक श्याम मुडे यांनी स्पष्टपणे सांगताना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आले आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पीढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळींकडून अपेक्षित आहे, असा आशावाद व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहेत आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहेत. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या भजनकरींनी गायलेल्या भजनांचा आनंद घेतला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content