HomeArchiveनिंबोणीच्या झाडामागे..

निंबोणीच्या झाडामागे..

Details
निंबोणीच्या झाडामागे..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मधुसूदन कालेलकर यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त २३ मार्चला मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्या मधुसूदन कालेलकर यांनी मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपट व २९ नाटके लिहिली त्यांचा २२ मार्च हा जन्मदिवस! यावर्षी त्यांची ९५ वी जयंती एमआयजी क्लब वांद्रे (पूर्व) यांच्यातर्फे क्लबच्या रुफ टॉपवर २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कालेलकरांनी लिहिलेली मराठी गाणी आणि त्यांनी लिहिलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी रुपेरी पडद्यावर दृकश्राव्य स्वरूपात सादर होणार आहेत. यावेळी गाण्यांच्या संदर्भातले काही मजेदार किस्सेही सांगितले जातील. यावेळी सरगम मुंबई या संस्थेस पत्रकार रमेश उदारे यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह व रोख पारितोषिक दिले जाईल. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या सागरा प्राण तळमळला.. या नाटकाच्या नवीन आवृत्तीचेही प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनित्री आशा काळे नाईक व अलका कुबल आठल्ये उपस्थित राहणार आहेत. गाण्याचा कार्यक्रम स्वरमुग्धा आर्ट्सतर्फे विवेक पुणतांबेकर व कृष्णकुमार गावंड सादर करणार असून सूत्रधार श्रीकांत कुलकर्णी आहेत. वरील कार्यक्रम एमआयजी क्लबने सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी विनामूल्य ठेवला आहे.
 
Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content