HomeArchiveललित कला अकादमीचे...

ललित कला अकादमीचे प्रदर्शन 16 एप्रिलपर्यंत सुरू!

Details
ललित कला अकादमीचे प्रदर्शन 16 एप्रिलपर्यंत सुरू!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शाळा–महाविद्यालयांच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
ललित कला अकादमीच्या मुंबईत सुरू असलेल्या साठाव्या राष्ट्रीय प्रदर्शनाची मुदत 8 एप्रिलवरून 16 एप्रिल 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या उन्हाळा आणि परीक्षांचे दिवस, यामुळे अनेक विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक इच्छा असूनही प्रदर्शन बघायला येऊ शकत नाहीत. 25 मार्चपासून सुरू असलेले हे प्रदर्शन आणि कला मेळ्याचे रसिकांकडून कौतुक होत आहे, हळूहळू प्रदर्शन बघायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घेऊन आम्ही सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या इमारतीत सुरू असलेल्या या प्रदर्शनाची मुदत 16 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांनी सांगितले. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने हे प्रदर्शन बघायला येतील, अशी अपेक्षाही पाचारणे यांनी व्यक्त केली.

अनेक वर्षांनी मुंबईला ह्या कला प्रदर्शनाचे यजमानपद मिळाले आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये सरू असलेल्या या प्रदर्शनातून ललित कला क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना नाव, कीर्ती आणि पैसा मिळवून देणारे एक मोठे व्यासपीठ आहे. तसेच, ललित कलांना सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. कला मेळ्यात एकूण 120 स्टॉल आहेत ज्यात पेंटिंग्ज, मूर्तीकला, मिश्र माध्यम याच्यासह अनेक माध्यमांतील कलांचे सादरीकरण आहे. विविध प्रदेशांच्या पारंपरिक चित्रशैली, स्थानिक प्रदेशातील संस्कृती आणि जीवनाचे रंग दर्शवणाऱ्या स्थानिक कलाकृतीदेखील यात आहेत. कुठे जलरंग तर कुठे पोस्टर कलर्समधल्या चित्रकृती! आधुनिक चित्रांमधून प्रतिकांच्या माध्यमातून गहन विचार व्यक्त केले आहेत. कला प्रदर्शनात एकूण 284 कलाकृती आहेत.

यंदा ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या सर्व १५ कलाकृतीदेखील या प्रदर्शनात आहेत. या कलाकृतींचे विषय बघितले तरी, आधुनिक कलाविष्कारांचे व्यापक आणि सखोल दर्शन आपल्याला घडेल. या कलाप्रदर्शनात रसिकांना उदयोन्मुख कलाकारांना भेटण्याची, देशभरातील कलाकृतींचा संगम बघण्याची संधी मिळते आहे. ज्येष्ठ आणि पुरस्कारप्राप्त कलाकारांशी संवाद साधता येतो आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात ललित कलांविषयी आकर्षण आणि आस्था निर्माण करणारा हा मंच आहे.

कला प्रदर्शन आणि मेळ्याच्या निमित्ताने यापरिसरात रोज संध्याकाळी संगीत, नाटक, नृत्य आणि काव्यगायनासारखे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.”
 
“शाळा–महाविद्यालयांच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content