Details
राष्ट्रीय कलामेळ्याची यशस्वी सांगता!
01-Jul-2019
”
भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
ललित कला अकादमी आयोजित राष्ट्रीय कलामेळ्याची रविवारी सांगता झाली. 60 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाबरोबरच ह्या कलामेळ्याचे आयोजन केले होते. मुंबईतल्या कलेचा मोठा वारसा असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्रांगणात हा कलामेळा भरला होता. यामध्ये देशभरातले चित्रकार, कला संस्था, चित्रकलेविषयक उत्पादनं आणि प्रकाशक यांचे 125 स्टॉल्स होते. लोकांनी कलामेळ्याला भेट दिली आणि निवडक चित्रांची खरेदीही केली. समारोपप्रसंगी ललित कला अकादमीच्या वतीनं सर्व सहभागी स्टॉलधारकांना प्रमाणपत्रं देण्यात आली.
या कलामेळ्यात शेवटच्या दिवशी प्रसिद्ध कथक नृत्यांगना नलिनी आणि कमलनी यांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला. कलामेळ्यातल्या कलाविष्काराची सांगता गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गायनाने झाली. भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कलामेळा संपला असला तरी राष्ट्रीय चित्र प्रदर्शन जे. जे. तसंच राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात येत्या 18 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. उद्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दुपारी 4.30 वाजता ज्योती भट्ट आणि हिम्मत शाह या कलाकारांवरील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. मर्यादित प्रवेश संख्येमुळे इच्छुकांनी [email protected] वर आगाऊ संपर्क साधून विनामूल्य प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय.
”
“भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध