HomeArchiveडॉ. वसंतराव देशपांडे...

डॉ. वसंतराव देशपांडे यांची जन्मशताब्दी धुमधडाक्यात!

Details
डॉ. वसंतराव देशपांडे यांची जन्मशताब्दी धुमधडाक्यात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते डॉ. वसंतराव देशपांडे. ज्यांनी बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गानप्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला, असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या ०२ मे २०१९ पासून सुरू होत आहे. त्यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांचं संगीत क्षेत्रातलं कार्य आणि गुरूप्रेम सर्वांना परिचित आहे. त्यांनी यानिमित्तानं दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले नसते तरच नवल!

. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांनी २००० साली वसंतराव देशपांडे संगीत सभेची स्थापना केली. वसंतरावांची गायकी, लय-सुरांवरचं प्रभुत्व, गाण्यातला शास्त्रशुद्धपणा, आवाजातला गोडवा, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद हा समृद्ध वारसा पुढे अविरत सुरू राहवा हा या संगीत सभेचा मूळ उद्द्येश. तो पं. लिमये यांनी मनोभावे जपला. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि वसंतरावांच्या कर्तृत्वाचे पुण्यसमरण करण्याच्या हेतूने पं. लिमये यांनी जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये असून संगीत सभेने दि. ५ मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे. यादिवशी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, फैयाज, राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.

यानंतर ‘वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरूकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरूण गायिका नुपूर काशीद-गाडगीळ व पद्मभूषण पंडिता प्रभाताई अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम जन्मशताब्दीनिमित्त सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवला आहे.

जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content