Details
अद्वितीय सोहळ्याने एलिफंटा महोत्सवाची सांगता!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शब्द, गीतांच्या अवर्णनीय सुरावटीवर चित्रांचा आणि शिल्पांचा होणारा अद्भुत अविष्कार म्हणजे काय असते, तो अनोखा संगम किती रमणीय असू शकतो याची अभूतपूर्व अनुभूती रसिक पर्यटकांना घारापुरीच्या जगद्विख्यात लेण्यांच्या पार्श्वभूमीवर घेता आली. निमित्त होते राज्यशासनाच्या पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयाच्या वतीने आयोजिलेल्या एलिफंटा महोत्सवाचे. या महोत्सवातील स्वरंग, या संकल्पनेंतर्गत रविवारच्या दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. पर्यटन संचालक दिलीप गावडे आणि घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यावेळी उपस्थित होते.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही अरबी समुद्राच्या कुशीत आपले वेगळेपण, ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वैभवाच्या खुणा जपणाऱ्या एलिफंटा म्हणजे घारापुरी बेटावर राज्य पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयाच्या वतीने एलिफंटा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातंर्गत सुरूवातीला दुपारच्या सत्रात सेरेब्रल पाल्सीसारख्या दुर्धर व्याधीने ग्रासलेल्या मुलांना ५० विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना घारापुरी येथील दीड हजार वर्षापूर्वी कोरल्या गेलेल्या प्रसिद्ध लेण्यांचे दर्शन घडवण्यात आले. या मुलांना इथे कोरण्यात आलेल्या शिवतांडव, योगमुद्रेतील शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन लेण्यांचे आणि शिल्पांचे दर्शन घडवण्यात आले. गेटवेपासून घारापुरीपर्यंतची बोटीतील सफर आणि या हेरिटेज वॉकमुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
त्यानंतर घारापुरी बेटावर महोत्सवासाठी आलेल्या रसिक पर्यटकांना शब्द, शिल्प, चित्रांचा अनोखा संगम असलेला स्वरंग हा स्वर्गीय सुरावटीसह, चित्रकलेचा अद्भुत अविष्कार सादर करणारा, मंत्रमुग्ध करणारा सोहळा म्हणजे कलेची अद्भुत मेजवानी ठरला. यावेळी मराठीतील आघाडीचे सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि राहुल देशपांडे यांनी आपल्या भव्य आणि नामवंत वाद्यवृंदासह सादर केलेला गान आविष्कार, शास्त्रीय गायनातील जुगलबंदी रसिकांना गांधर्वगायनाची आठवण करून देणारी ठरली. तर गायिका प्रियंका बर्वे हिने सादर केलेले नाही बोलत मी नाथा.. हे नाट्यगीत आणि अन्य गीते रसिक पर्यटकांना मंत्रमुग्ध करून गेली. या दोन कलावंतांच्या अलबेला सजन आयो रे आणि पायरिया झनकाओ या दोन गीतांच्या जुगलबंदीच्या स्वर्गीय सुरावटीच्या तालावर त्याच रंगमचावर एकाचवेळी सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी आपल्या ब्रशच्या फटकाऱ्यातून सुलेखनकलेचे अप्रतिम दर्शन घडवले.
या भारलेल्या वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकार अजय देशपांडे अनेक व्यक्तिचित्रे रेखाटली. अमोल टकले याने शिवतांडवाशी नाते सांगणारा आपल्या अप्रतिम चित्रकलेचा नजराणा यावेळी पेश केल्याने त्याने रेखाटलेली चित्रे रसिक पर्यटकांना मोहवून गेली. चंद्रजित यादव यांनी अनेक सुंदर व्यक्तिशिल्पे साकारून आणि श्रीकांत चौगुले यांनी भारतीय शिल्पकलेचा नमुना सादर करून पर्यटकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आपल्या कुंचल्याचे कौशल्य दाखवत निलेश जाधव यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सोहळ्यात भरलेले रंग आणि शील कुंभार यांनी मनोहारी रंगाची उधळण करीत सादर केलेला बहारदार रंगकलेचा आविष्कार उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. स्वप्निल आणि प्रियंकाने गायलेल्या गाण्यांच्या सुरावटीवर या सर्व नामवंत कलावंतांच्या कलांचा पहिल्यांदाच झालेला हा अद्वितीय व्यामिश्र अविष्कार हा रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरला.”
“केएचएल न्यूज ब्युरो