HomeArchiveयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून आवाहन

Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून आवाहन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. 2019 वर्षासाठी हे पारितोषिक कृषि-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृति या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे. रोख रक्कम 2 लाख रूपये व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.

या पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी व पोरितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई 400021 या पत्त्यावर संपर्क साधावा. पारितोषिकासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारीख 30 सप्टेंबर 2019 अशी आहे.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने 1985 साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

युपीआय आणि रुपे व्यवहारांवरच्या शुल्कामागे अमेरिकेचा दबाव?

युपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लवकरच 'मर्चंट डिस्काउंट रेट' (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत 'टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल २०२६' मंजूर केले आहे. यामुळे, सध्याच्या 'झीरो-एमडीआर' (मोफत व्यवहार) धोरणात...

ईएमआयवर स्मार्टफोन, लॅपटॉप घेताय? मग लक्षात ठेवा…

जर तुम्ही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी)कडून ईएमआयवर मोबाईल (स्मार्टफोन), लॅपटॉप किंवा इतर डिजिटल गॅझेट खरेदी केले असेल आणि त्याचे हप्ते भरण्यास विलंब केला, तर आता बँका ते दूरस्थपणे (रिमोटली) लॉक करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने बहुप्रतिक्षित...

मराठा समाजाला मिळणार ओबीसी प्रवर्गात आरक्षण?

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (इडब्ल्यूएस) दिलेल्या आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यास घटनात्मक मान्यता मिळाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते, हे यातून दिसून आले आहे. त्यामुळे याच इडब्ल्यूएस आरक्षणाच्या धर्तीवर मराठा...
Skip to content