HomeArchiveडॉ. विजया वाड...

डॉ. विजया वाड यांच्या 143 व्या पुस्तकाचे प्रकाशन

Details
डॉ. विजया वाड यांच्या 143 व्या पुस्तकाचे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या 143 व्या `भेट’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या कन्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते मुंबईच्या भांडुपमधील राजारामशेट विद्यालय, खिंडीपाडा येथे करण्यात आले.

या गोड बालकादंबरीच्या प्रकाशनासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकच गर्दी केली होती. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश खानविलकर होते. विवेक प्रकाशनची ही भेट असून गोळे व शीतल खोत याप्रसंगी उपस्थित होते. या बालकादंबरीत आई-बाबा वेगळे झालेल्या मुलांची भावपूर्ण कथा आहे. शिक्षिका मुलांची नाजूक अवस्था पाहून भारावतात. माया उचंबळून येते नि सोमणबाई हे घर परत एकत्र आणतात. आजुबाजूच्या किशोरावस्थेतील मुलांची जशी अशा अवस्थेत घालमेल होईल, तशीच कादंबरीतील यश आणि आरतीचीही होते. बालदोस्त खूश होतील, असा विश्वास डॉ. विजया वाड यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. निशिगंधा वाड यांनी, ही बालकादंबरी वाचून मन कसे सुसंस्कारित होते, त्याची सुंदर उदाहरणे दिली. भगवान गौतम बुद्ध नि त्यांचा शिष्य यांच्यातील एक गोड गोष्टदेखील सांगून जीवनात प्रत्येक क्षण नि चीज याचा सदुपयोग करण्याचा पाठच दिला.

विजयाबाईंनी घर ही सुंदर कविता मुलांसोबत गायली. गोळे आणि खानोलकर सर यांनी आई-वडिलांवर प्रेम करा नि घर आनंदी ठेवा, असा भावपूर्ण सल्ला दिला. इतक्या पावसातही हॉल भरगच्च होता हे विशेष. भांडुपच्या नगरसेविकाही यावेळी उपस्थित होत्या.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...
Skip to content