HomeArchiveखिलाफत चळवळीतूनच धर्माचा...

खिलाफत चळवळीतूनच धर्माचा राजकारणात प्रवेश – विक्रम संपत

Details
खिलाफत चळवळीतूनच धर्माचा राजकारणात प्रवेश – विक्रम संपत

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
खिलाफत चळवळीच्या माध्यमातूनच धर्मावर आधारित राजकारणाची सुरूवात झाली आणि त्यातूनच पुढे फाळणीची बीजे पेरली गेली, असे विश्लेषण साहित्य अकादमी पुरस्कारविजेते प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी नुकतेच केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने त्यांनी लिहलेल्या `सावरकर – एकोज फ्रॉम दी फरगॉटन पास्ट’ या पुस्तकावर आयोजित चर्चेत ते बोलत होते.
 
 
पत्रकार प्रसाद काथे यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचनात्मक उत्तरं दिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या १२ राज्यातील विद्यार्थ्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यांनीदेखील विक्रम यांच्याशी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अधिक जाणून घेतले.
 
 
अभ्यासक्रमातही सावरकरांविषयी आकस
 
सीबीएसईसारख्या अभ्यासक्रमात आकसापोटी त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळेच आजच्या युवा पिढीपर्यंत सावरकर पोहोचणे गरजेचे आहे. या भावनेतून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा अधिक तीव्र झाला. संसदेत त्यांचे तैलचित्र लावल्यानंतर तसेच केंद्रीय मंत्री असताना मणिशंकर अय्यर यांनी दाखविलेली असूया अशा प्रसंगातून ही भावना अधिकच दृढ होत गेली. स्वा. सावरकर यांच्यावर आजही चर्चा होताना दिसून येते. यातूनच त्यांचा प्रभाव आणि विचार जिवंत असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
क्रांतीचा पाया मुलभूत तत्त्वावर आधारित
 
 
क्रांती घडविण्यासाठी तिचा पाया मुलभूत तत्त्वांवर आधारित असावा लागतो. त्याबद्दल त्यांचा अभ्यास वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच होता. अष्टभुजादेवीसमोरची शपथ असो किंवा विदेशी कपड्यांची होळी, या प्रसंगातून त्यांचे विचार जनमानसापुढे त्या काळात प्रभावीपणे आले आणि अनेकांना प्रेरणा मिळाली. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे विवेचन त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेला हादरा हा क्रांतीच्या तत्त्वांचा आणि निर्धाराचा परिपाक होता. गांधींनी मोपला, बंगाल, दिल्ली, स्वामी श्रद्धानंदाच्या खुन्याला बंधुत्वाचे नाते सांगितल्यानंतर त्यांना प्रतिकार होणे गरजेचे होते. म्हणूनच हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करणारे हिंदुत्व हे इंग्रजीतील पुस्तक लिहून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार नेला.
 
 
माफी नाही तर देशकार्य संधीची याचिका
 
त्यांच्या माफीनाफ्याची नेहमीच गल्लत केली गेली आहे. हा माफीनामा नसून केवळ याचना आहे आणि ती तत्कालिक परिस्थितीत क्रांतीकार्य करण्यासाठी मिळालेली एक संधी होती. ते स्वतः बॅरिस्टर होते. शिवाय राजबंद्यांची नियमावली त्यांना ठाऊक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य न करता त्यांनी देशकार्याच्या संधीसाठी केलेली युक्ती होती, हे ध्यानात घेतले नाही तर आपण फार मोठी चूक करून घेत आहोत, हे राहुल गांधींसारख्यांनी समजले पाहिजे. स्वतः त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ओळखले होते व त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता, हे त्यांनी विचारात घेतले पाहिजे, या मुद्यांवरदेखील विक्रम संपत यांनी भर दिला.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“खिलाफत चळवळीच्या माध्यमातूनच धर्मावर आधारित राजकारणाची सुरूवात झाली आणि त्यातूनच पुढे फाळणीची बीजे पेरली गेली, असे विश्लेषण साहित्य अकादमी पुरस्कारविजेते प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी नुकतेच केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने त्यांनी लिहलेल्या `सावरकर – एकोज फ्रॉम दी फरगॉटन पास्ट’ या पुस्तकावर आयोजित चर्चेत ते बोलत होते.”
 
 
पत्रकार प्रसाद काथे यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचनात्मक उत्तरं दिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या १२ राज्यातील विद्यार्थ्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यांनीदेखील विक्रम यांच्याशी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अधिक जाणून घेतले.
 
 
अभ्यासक्रमातही सावरकरांविषयी आकस
 
“सीबीएसईसारख्या अभ्यासक्रमात आकसापोटी त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळेच आजच्या युवा पिढीपर्यंत सावरकर पोहोचणे गरजेचे आहे. या भावनेतून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा अधिक तीव्र झाला. संसदेत त्यांचे तैलचित्र लावल्यानंतर तसेच केंद्रीय मंत्री असताना मणिशंकर अय्यर यांनी दाखविलेली असूया अशा प्रसंगातून ही भावना अधिकच दृढ होत गेली. स्वा. सावरकर यांच्यावर आजही चर्चा होताना दिसून येते. यातूनच त्यांचा प्रभाव आणि विचार जिवंत असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.”
 
 
क्रांतीचा पाया मुलभूत तत्त्वावर आधारित
 
 
“क्रांती घडविण्यासाठी तिचा पाया मुलभूत तत्त्वांवर आधारित असावा लागतो. त्याबद्दल त्यांचा अभ्यास वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच होता. अष्टभुजादेवीसमोरची शपथ असो किंवा विदेशी कपड्यांची होळी, या प्रसंगातून त्यांचे विचार जनमानसापुढे त्या काळात प्रभावीपणे आले आणि अनेकांना प्रेरणा मिळाली. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे विवेचन त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेला हादरा हा क्रांतीच्या तत्त्वांचा आणि निर्धाराचा परिपाक होता. गांधींनी मोपला, बंगाल, दिल्ली, स्वामी श्रद्धानंदाच्या खुन्याला बंधुत्वाचे नाते सांगितल्यानंतर त्यांना प्रतिकार होणे गरजेचे होते. म्हणूनच हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करणारे हिंदुत्व हे इंग्रजीतील पुस्तक लिहून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार नेला.”
 
 
माफी नाही तर देशकार्य संधीची याचिका
 
“त्यांच्या माफीनाफ्याची नेहमीच गल्लत केली गेली आहे. हा माफीनामा नसून केवळ याचना आहे आणि ती तत्कालिक परिस्थितीत क्रांतीकार्य करण्यासाठी मिळालेली एक संधी होती. ते स्वतः बॅरिस्टर होते. शिवाय राजबंद्यांची नियमावली त्यांना ठाऊक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य न करता त्यांनी देशकार्याच्या संधीसाठी केलेली युक्ती होती, हे ध्यानात घेतले नाही तर आपण फार मोठी चूक करून घेत आहोत, हे राहुल गांधींसारख्यांनी समजले पाहिजे. स्वतः त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ओळखले होते व त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता, हे त्यांनी विचारात घेतले पाहिजे, या मुद्यांवरदेखील विक्रम संपत यांनी भर दिला.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content