HomeArchiveअरविंद पारिख यांना...

अरविंद पारिख यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार!

Details
अरविंद पारिख यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार!

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.
 
 
१९ ऑक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर पुढची साठ वर्षे, उस्तादजींच्या अखेरपर्यंत त्यांचे हे शिक्षण अव्याहतपणे सुरू होते. या काळात त्यांनी इतर अनेक महान गायक-वादकांच्या शैलीचाही जवळून अभ्यास केला. त्यातील अनेक बारकावे त्यांच्या वादनात दिसून आले. पं. पारिख आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांनी देश-विदेशात सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. सितार गुरू व बंदिश परंपरा या ग्रंथांमध्ये बांधलेल्या त्यांनी बंदिशींचा समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या संगीतविषयक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी तीन वर्षे काम पाहिले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले असून जगभरात त्यांचे शिष्य त्यांचे संगीत प्रसाराचे कार्य पुढे नेत आहेत.
 
 
शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परविन सुलताना, माणिक भिडे, पं. केशव गिंडे, यासारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 

“महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.”
 
 
“१९ ऑक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर पुढची साठ वर्षे, उस्तादजींच्या अखेरपर्यंत त्यांचे हे शिक्षण अव्याहतपणे सुरू होते. या काळात त्यांनी इतर अनेक महान गायक-वादकांच्या शैलीचाही जवळून अभ्यास केला. त्यातील अनेक बारकावे त्यांच्या वादनात दिसून आले. पं. पारिख आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांनी देश-विदेशात सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. सितार गुरू व बंदिश परंपरा या ग्रंथांमध्ये बांधलेल्या त्यांनी बंदिशींचा समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या संगीतविषयक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी तीन वर्षे काम पाहिले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले असून जगभरात त्यांचे शिष्य त्यांचे संगीत प्रसाराचे कार्य पुढे नेत आहेत.”
 
 
“शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परविन सुलताना, माणिक भिडे, पं. केशव गिंडे, यासारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.”

Continue reading

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...
Skip to content