HomeArchiveतुम्हाला जाणवतंय का?

तुम्हाला जाणवतंय का?

Details
तुम्हाला जाणवतंय का?

    09-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

 
 
भगवान निळे..
ज्येष्ठ पत्रकार 
 
 
कवितेच्या परिभाषेत तुम्ही सर्व सुखी असलात तरी तुम्हाला जाणवतंय का?
 
 
हल्ली झाडंही मनासारखी डुलत नाहीत
पाखरांचा चिवचिवाटही कमी झालाय.. 
फुलं फुलतात पण हसत नाहीत 
वासरं बिलगत नाहीत, गाई हंबरत नाहीत.. 
नद्या विसरल्यात अवखळपणा
जमिनीनं सोडून दिलीय लाज..
स्वच्छ निळंभोर आकाश पाहून वर्षं उलटलीत
चंद्र जास्तच थंड अन सूर्य अधिक उग्र झालाय..
चांदण्या भीतभीतच मिचकावताहेत डोळे
इमारतींचे उडत चाललेत रंग
झोपडपट्ट्याही सुस्तावल्यात
रस्ते नुसतेच पडून आहेत..
समुद्र माघार घेतल्यासारखा हटतोय मागे मागे
पाऊस येतंच नाही
आला की सर्वकाही धुऊन जातोय..
अंधाराच्या वाटेनं अदृश्य होऊ लागलीत स्वप्नं
पुस्तकाच्या पानासारखे पालटताहेत दिवस 
सर्वच काही बदलत चाललंय तुमच्या मनाविरूद्ध..
विनाशाची वाट राजमार्ग बनलीय नि 
जगणं अधिकच मुश्किल होऊ लागल्यानं 
वाढू लागलीय 
मंदिर, मस्जिद, चर्च, विहारांमध्ये गर्दी..
प्रत्येकजण गुंतलाय तयार करण्यात
आकाशापर्यंत जाणारी एक एक शिडी.
तुम्हाला जाणवतंय का?
तुम्ही तुमच्यातच हरवत चाललाय
अन् 
तुम्हाला ऐकू येत नाही तुमच्या आतला आवाज!
 
 

 ”

 

 
 
भगवान निळे..
ज्येष्ठ पत्रकार 
 
 
कवितेच्या परिभाषेत तुम्ही सर्व सुखी असलात तरी तुम्हाला जाणवतंय का?
 
 
हल्ली झाडंही मनासारखी डुलत नाहीत
पाखरांचा चिवचिवाटही कमी झालाय.. 
फुलं फुलतात पण हसत नाहीत 
“वासरं बिलगत नाहीत, गाई हंबरत नाहीत.. ”
नद्या विसरल्यात अवखळपणा
जमिनीनं सोडून दिलीय लाज..
स्वच्छ निळंभोर आकाश पाहून वर्षं उलटलीत
चंद्र जास्तच थंड अन सूर्य अधिक उग्र झालाय..
चांदण्या भीतभीतच मिचकावताहेत डोळे
इमारतींचे उडत चाललेत रंग
झोपडपट्ट्याही सुस्तावल्यात
रस्ते नुसतेच पडून आहेत..
समुद्र माघार घेतल्यासारखा हटतोय मागे मागे
पाऊस येतंच नाही
आला की सर्वकाही धुऊन जातोय..
अंधाराच्या वाटेनं अदृश्य होऊ लागलीत स्वप्नं
पुस्तकाच्या पानासारखे पालटताहेत दिवस 
सर्वच काही बदलत चाललंय तुमच्या मनाविरूद्ध..
विनाशाची वाट राजमार्ग बनलीय नि 
जगणं अधिकच मुश्किल होऊ लागल्यानं 
वाढू लागलीय 
“मंदिर, मस्जिद, चर्च, विहारांमध्ये गर्दी..”
प्रत्येकजण गुंतलाय तयार करण्यात
आकाशापर्यंत जाणारी एक एक शिडी.
तुम्हाला जाणवतंय का?
तुम्ही तुमच्यातच हरवत चाललाय
अन् 
तुम्हाला ऐकू येत नाही तुमच्या आतला आवाज!

 
 

 

जाणवतंय का?पाऊसस्वच्छ निळंभोर आकाशझाडंपाखरांचा चिवचिवाटमंदिरमस्जिदचर्चविहार

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content