HomeArchiveएका व्रतस्थाप्रमाणे जगलेले...

एका व्रतस्थाप्रमाणे जगलेले विक्रमराव सावरकर!

Details
एका व्रतस्थाप्रमाणे जगलेले विक्रमराव सावरकर!

    02-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. 

ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांची आज म्हणजेच 2 डिसेंबर 2018 रोजी जयंती असून त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही माहिती…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस प्रत्यक्ष विचारातूनही तितक्याच प्रभावीपणे कृतीतून साकारणारे विक्रमराव सावरकर यांनी अखंडपणे आपल्या हिंदू संघटन कर्तव्याचेच पालन केले. 1964 सालच्या जागतिक साई युकॉरिस्टिक काँग्रेसमधून पोपच्या विरोधात जाऊन हाणून पाडलेले लक्षावधींचे धर्मांतर, पूर्व पाकिस्तानातील हिंदूंच्या अमानुष कत्तलीविरोधातील आंदोलनं, पाचगणीच्या मॉरेल रिअर्मामेंट आर्मीच्या माध्यमातून राजमोहन गांधींच्या धर्मांतराचा
कट, गुजरातमधील सिद्धपूर येथील मंदिर मुक्ती आंदोलन, 1973 सालचे सिमला कराराविरोधातील कचौली ते सिमलापर्यंतचे गनिमी काव्याचे आंदोलन, 1981 मधील कल्याण-भिवंडीतील शिवजयंती मिरवणुकीतील बंदी, 1986 मध्ये पोपच्या भारतभेटीच्या विरोधात निदर्शने अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. कृतीशीलता या त्यांच्या स्थायी भावातूनच आतापर्यंतची त्यांची आंदोलनं राहिली आहेत.

त्यांच्या आंदोलनाचा राज्यकर्त्यांनी इतका धसका घेतला की, चक्क त्यांना 18 नोव्हेंबर 1964 ला भारत संरक्षणाच्या डीआयआर अशा भयानक कायद्याखाली नाहक अटक केली. अशा बाबतीत अटक करण्यात आलेले हे
एकमेव राजकीय आंदोलक म्हणता येतील. देशाच्या हितासाठी सातत्याने त्यांनी समान नागरी कायद्याचा अवलंब केला. प्रत्येकाला समान संधी व न्याय मिळाला पाहिजे, ही त्यामागची पवित्र भावना असूनही त्याला अद्यापही राज्यकर्त्यांनी स्वीकारलेले नाही. त्याबाबत आजही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

तुर्कस्तान, अल्जेरिया,अल्बानिया, बांगालदेश, जुनई, सायप्रस, सुदान, इराण,  इराक, मालेशिया, इंडोनेशिया, लिबिया,इजिफ्त, लेबनॉन, जॉर्डन, येमेन, ट्युनिशिया, मोरोक्को, सीरिया या मुस्लिम राष्ट्रांमध्ये कुराणातील मूळ निर्बंध बदलून समान नागरी संहिता लागू करण्यात आली आहे. मग हिंदुस्थानसारख्या धर्मनिरपेक्ष देशात असे का होत नाही, हे केवळ आपल्यापुरतेच नव्हे तर संपूर्ण जगाला पडलेले कोडे आहे. मात्र, अशा प्रश्नांमध्ये हिंदुस्थानातील सामान्य जनता स्वारस्य घेत नसल्यामुळेच आंदोलन उभे राहत नाही. हे नेमके काय आहे आणि आपण आपल्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे, याचे जनतेला प्रबोधन करणे, ही फार मोठी आव्हानं आपल्यापुढे आहेत.

विक्रमराव सावरकर हेच एकमेव नागरिक होते ज्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. शासनाने दोन वेळा संधी देऊनही आपली बाजू मांडली नाही. तसेच खटल्यातील अधिवक्ता भास्करराव कुलकर्णी यांना युक्तिवाद करू न देताच ही याचिका खारिज करण्यात आल्यामुळे हा प्रयत्न तिथेच थांबला आणि नियमानुसार एकाच व्यक्तीला अशी याचिका दुसऱ्यांदा करता येत नाही. यानंतर तसे प्रयत्न इतर कुणी केले नाहीत.

प्रत्येक आंदोलनात त्यांची वैशिष्ट्यं दिसतात ती म्हणजे, तात्त्विक भूमिका आणि कृतीशीलता. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला एक आधार होता. लोकशाही म्हटलं की, निवडणूक आलीच. निवडणूकीतही जन-धन-साधनं या यंत्रणांचा अभाव असूनसुद्धा त्यांनी हिंदू महासभेला पायाभूत असणारी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित देशहितकारी तत्त्वं प्रचारण्याच्या हेतूने भाग घेतला. मतदारांसाठी स्वातंत्र्यवीरांचे स्पष्ट मार्गदर्शन होईल व माझे मत खऱ्या हिंदुत्वनिष्ठाला देईन, याबाबत त्यांच्या जागरूकतादेखील होईल. असे त्यांचे विचार होते.

हिंदूंचे सैनिकीकरण याच्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. प्रत्यक्ष कृतीतून ते साकारण्यासाठी मुरबाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना त्यांनी केली असून या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून लौकिक प्राप्त करत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत त्यांनी हिंदू संघटन व हिंदू रक्षणाची मोहीम राबवली. या कार्यात नंतरच्या काळात मात्र, कृतीशील अनुयायी होऊ शकले नाहीत, ही भारतीयांसाठी दुर्दैवाची बाब ठरली. त्यामुळेच विक्रमरावांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे महत्त्व आहे. कर्तव्य भावनेतून त्यांनी केले असले तरी त्यांच्या विचारातून या देशाच्या अखंडता आणि एकात्मताच्या वाढीसाठी हिंदू संघटन अधिक प्रभावीपणे उभे राहणे, ही काळाची गरज झालेली आहे. त्यादिशेने जनमानस तयार व्हायला हवे.

संपर्क – 022-24465877″
 

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content