Details
ज्युनियर राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपविजेतेपद मुलांच्या संघाला मिळाले तृतीय स्थान
01-Jul-2019
”
प्रतिनिधी : अमॅच्यूअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व चंदीगड लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडामहर्षी संतोष गुरव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहावी ज्युनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच चंदीगडमध्ये पार पडली. या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक व्दितीय क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उदघाटन आशियाई व भारतीय ग्लोबल व्हिक्स या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुमेन तिवारी यांच्या हस्ते झाले. भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव, चंदीगड लगोरी संघटनेचे सचिव सुरेंद्र सिंह, तांत्रिक मार्गदर्शक तुषार जाधव, भरत गुरव, संघटनेच्या अँड. प्रिया संतोष गुरव, मनोज कुमार, चिंतामणी आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटनाप्रसंगी डॉ. सुमेन यांनी लहानपणीच्या लगोरी खेळासंबंधीच्या आठवणी सांगितल्या व या खेळाचा चंदीगडमध्ये प्रसार होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.
लगोरी खेळाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील लगोरीचे संस्थापक संतोष गुरव यांनी तन-मन-धन अर्पून प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यांसह जगभरातील ३० देशांमध्ये आज तो खेळला जात आहे. संतोष गुरव, गतवर्षी अचानकपणे आपल्यातून निघून गेले आहेत. लगोरी खेळ संपूर्ण भारतातील सर्व राज्यांमध्ये जास्तीतजास्त लोकप्रिय होऊन हा खेळ ऑलम्पिकपर्यंत नेण्याचे तसेच लगोरीला
उच्च स्थान देण्यासाठी पाहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच लगोरीचा वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष संदीप गुरव यांनी यावेळी केले.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्ली (प्रथम), दादरा-नगरहवेली (व्दितीय) आणि गोवा व महाराष्ट्र संघांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात गोवा (प्रथम), महाराष्ट्र (व्दितीय) तर दिल्ली आणि पुद्दूचेरी
संघांना तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून राजेंद्र पाटील, तन्वेश वेंकटेश्वर, संतोष नाईक, रमेश हजारे, संजय, स्वप्नील, तुषार यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.”
“प्रतिनिधी : अमॅच्यूअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व चंदीगड लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडामहर्षी संतोष गुरव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहावी ज्युनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच चंदीगडमध्ये पार पडली. या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक व्दितीय क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.