HomeArchiveराहुल चुकले!

राहुल चुकले!

Details
राहुल चुकले!

    31-Jan-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर चांगलेच भडकले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांनी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. पर्रिकर हे गेले अनेक दिवस कर्करोगासारख्या गंभीर व्याधीने आजारी आहेत. ते लवकर बरे व्हावेत, ही सर्वांची इच्छा आहे. आजारपणात एखाद्याला भेटणे आणि त्याची विचारपूस करणे हे झाले सौजन्य. पण या भेटीचा उपयोग राजकीय कारणासाठी करणे हा झाला असभ्यपणा. राहुल गांधी यांनी हाच असभ्यपणा केल्याचा पर्रिकर यांचा आरोप आहे. पर्रिकर यांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर राहुल यांनी कोची येथे बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाषण केले. तेथे त्यांनी म्हटले की, `राफेल व्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याचे पर्रिकर यांनी आपल्याला सांगितले आहे.’ राफेल व्यवहार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या तुंबड्या भरण्यासाठी घडवून आणला हा काँग्रेसचा आरोप आहे. संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकर या व्यवहारात कोठेही नव्हते हे राहुल गांधी त्यांना भेटल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते.

सारांश, त्यांनी राफेल वादात अंथरूणाला खिळलेल्या पर्रिकरांना ओढले आहे. म्हणूनच पर्रिकर संतप्त झाले आहेत. राहुल यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करीत आहेत. आपण त्यांच्याशी राफेल व्यवहाराबाबत बोललोच नसल्याचे सांगत आहेत. राहुल आणि पर्रिकर हे दोघेही मोठे नेते आहेत. राहुल यांनी 63 वर्षीय पर्रिकरांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, हे योग्यच झाले. या भेटीत त्यांनी राफेल व्यवहाराबाबत चर्चा केली की नाही हे ते आणि पर्रिकर जाणोत. तशी चर्चा झाली असेल आणि पर्रिकर ती नाकारत असतील, तर पर्रिकर खोटारडे आहेत. पण तशी चर्चा झालीच नसेल आणि राहुल ती झाली असल्याचे सांगत असतील, तर राहुल खोटारडे ठरतात. अर्थात, या दोघांपैकी खोटारडे कोण हे ते दोघेच जाणोत. पण यात चूक जर कोणाची असेल तर ती राहुल गांधी यांची आहे. राफेल हा अत्यंत वादग्रस्त विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने तो चांगलाच शेकवला आहे. तो अधिक शेकवण्यासाठी काँग्रेसने काही राजकीय डावपेच टाकणे हे समजण्यासारखे आहे. पण मृत्यूशी झुंज देत असलेल्या नेत्याला या वादात ओढून दुसरा वाद निर्माण करणे, हे अयोग्य आहे.

राहुल हे सौजन्यमूर्ती असल्याचे त्यांनी वारंवार आपल्या वागणुकीने दाखवून दिले आहे. `तुम्ही आमचा तिरस्कार करता, पण आम्ही तुमचा तिरस्कार करणार नाही. तुमच्यावर प्रेमच करू,’ असे त्यांनी संसदेत मोदींना सांगणे, भाषण संपवून मोदींजवळ जाऊन त्यांना प्रेमाने आलिंगन देणे, आदी गोष्टी राहुल यांची सभ्यता आणि चांगले संस्कार दर्शवितात. पर्रिकरांची त्यांनी आस्थेने भेट घेतली तेव्हादेखील त्यांचे हे संस्कार दिसून आले. पण नंतर या भेटीचे त्यांनी राजकारण केल्यावर राहुल हेच टीकेचा विषय ठरले आहेत. पर्रिकर यांनी मनमोकळेपणाने राहुल यांच्याशी राफेल व्यवहाराबाबत चर्चा केली असेल, तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. राहुल यांना चांगला मित्र मानून त्यांनी आजारपणात त्यांच्याजवळ आपले मन मोकळे केले असे म्हणावे लागेल. पण या मित्राने त्यांचे खासगीतील बोलणे जाहीर करून त्यांचा विश्वासघात केला, असेदेखील खेदाने म्हणावे लागेल. राजकारणात मतभेद असले तरी मनभेद असू नयेत. म्हणूनच अनेक राजकीय नेते आपल्या पक्षाच्या चौकटी ओलांडून खासगी बैठकीत एकत्र येतात आणि दिलखुलासपणे गप्पा मारतात. या गप्पांच्या कधी बातम्या होत नाहीत कारण त्या मित्रांनी मोठ्या विश्वासाने मारलेल्या गप्पा असतात. पर्रिकर यांनी राहुल यांच्याशी अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यादेखील असतील. पण त्याबाबत राहुल यांनी जाहीर वाच्यता करणे हे अयोग्यच होय. यात खोटारडे कोण हा विषय बाजूला ठेवू. पण चुकले कोण? असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचे उत्तर असेल `राहुल गांधी’!”
 

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content