HomeArchiveकाय असणार भूमिका...

काय असणार भूमिका मुस्लिमबहुल राज्यांची?

Details
काय असणार भूमिका मुस्लिमबहुल राज्यांची?

    26-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com

जगात विविध भाषिक, सांस्कृतिक रीतीरिवाज असलेला देश म्हणून भारत, हिंदुस्थानचं नाव घेतलं जातं. आदिम काळापासून या देशावर अनेक आक्रमणे झाली, हा इतिहास सुदैवाने कोणी नाकारत नाही. यातून लूटपाट, अत्याचार झाले हेदेखील सर्वांना मान्य आहे. या राष्ट्रात अनेक धर्म जाती, जमाती आपापलं वैशिष्ट्य जपत राहतात. जवळपास लोकसंख्येच्या १४% मुसलमान या देशात आहेत. तर पाच राज्यांत त्यांची संख्या मोठी आहे, बघा कोणती राज्ये आहेत ती!

लोकसंख्येच्या बाबतीत चीनशी १९-२०, उन्नीस बीस करणाऱ्या आपल्या देशावर आयात मालाचे आक्रमण खूपच वाढलंय हे कोणीही मान्य करतं. पण, हातातला मोबाईल जो चीनचा, संगणक तिकडचाच त्याचा वापर मात्र सोडत नाहीत. अशा अनेक बाबी सांगता येतील इतर तर सोडाच. तरीही गेल्या काही काळात आपण प्रगतीची कवाडं खुली करीत देशाला प्रगतीकडे नेलंय. सुमारे नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०११ साली जनगणना झाली तो भारत १२५ कोटींवरून १३५ कोटींवर पोह्चल्याचं सांगितलं जातं. काही राज्यात मुस्लिम कमी आहेत. सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश कोणता हे अनेक जण सांगू शकणार नाहीत. जम्मू- काश्मीर, असे काहीजण सांगतील, पण तसं नाहीये. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश पहिला आहे. तिथे ९६% मुस्लिम आहेत. समुद्र किनारा असलेल्या भागामुळे मच्छिमारी व्यवसायात हेच आढळतात. शिक्षण प्रमाणही भरपूर म्हणजे ९३ टक्के इतके आहे. इथून एकच खासदार संसदेत बसतो. त्यात बदल नाही. ही जागा काँग्रेसकडे आहे.

पुढचं राज्य अर्थातच जम्मू काश्मीर – इथे ६८% मुसलमान आहेत. पाकव्याप्त काश्मीर धरला तर हा आकडा ८५% वर जाईल. पूर्वोत्तर भागात आसामची लोकसंख्या. मुस्लिम टक्केवारी जास्त सांगते जी ३४% एवढी आहे. तथापि, आसामी समाजातील हे मुस्लिम आहेत तसे बंगाली मुसलमानही खूप प्रमाणात आहेत.
पश्चिम बंगाल. या राज्यात या धर्माच्या लोकसंख्येचं प्रमाण साधारण २७% इतकं आहे. खासकरून माल्डा, मुर्शिदाबाद येथे मोठं असून कोलकाता, हावडा या ठिकाणीही चांगलाच, जास्त संख्येने मुस्लिम रहिवास आढळतो.

केरळात मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण हे २६% पेक्षा अधिक मानलं जातं. भारतात पहिली मस्जिद ही केरळात उभी राहिल्याचे म्हटले जाते. देशात पहिल्यांदा यवनी धर्म अरब व्यापाऱ्यांकडून केरळमार्गे प्रवेश केल्याचे सांगतात. पाकिस्तानमधील हिंदूबहुल गावाचा
विषयजरी देशातील मुस्लिम धर्म लोकसंख्येचा असला तरी शेजारच्या देशात एकमेव असं गाव आहे, जिथे हिंदू लोकसंख्या ८०% आहे. नुकताच पाकिस्तानात हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप केल्यावर पाकिस्तानला संबंधित मौलवीला अटक करावी लागली. या शहराचं नाव मिठी असून ते मिठी थरपारकार जिल्ह्यात येतं. हे लाहोरपासून ८७५ तर गुजरातच्या कर्णावतीपासून ३४० कि.मी. अंतरावर आहे. इथे हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा दाखला दिसून येतो. इथली लोकसंख्या ८७ हजार आहे. त्यात सुमारे ८० टक्के हिंदू असून पूर्ण पाकिस्तानात ९५ टक्के मुस्लिम आहेत. धार्मिक सलोखा ईद दिवाळी एकत्र साजरा करून टिकवला जातो. गायींची कत्तल होत नाही, गुन्हे दरदेखील खूपच कमी आहे. मंदिरं खूप असून श्रीकृष्ण मंदिर विख्यात आहे. पूजा होताना जोराचे स्पीकर वाजत नाहीत, अजान असता घंटा वाजत नाही. १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यामुळे येथील मुसलमान पळाले होते. पण, नंतर स्थानिक हिंदूंनी राहण्यासाठी विनवणी केल्यावर ते राहू लागले.
मात्र,भारताच्या बहुतांश भागात विरोधाभासी चित्र दिसते. छोट्या कारणानेसुद्धा दंगली घडून कत्तली होतात, वातावरण समाज ढवळून निघतो. त्यास कोणतेही निमित्त चालते. काही पत्रकार, माध्यमे यात भर घालतात. गेल्या पाच वर्षांत काही अपवाद वगळता देशात शांतता आहे. शांततेत विकासाची मुळं रुजली जातात, दंग्याधोप्याने काहीच साधत नाही, भरून न येणारी हानी मात्र होते. माथी भडकवण्याचा प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज कोणाबरोबर उभा राहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content