HomeArchiveआढळराव यांना डॉ....

आढळराव यांना डॉ. कोल्हे यांचे तगडे आव्हान!

Details
आढळराव यांना डॉ. कोल्हे यांचे तगडे आव्हान!

    28-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा वगळता पुणे, शिरूर, मावळ या तिन्ही लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे खासदार गेल्या निवडणुकीत निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत या उमेदवारांचे मताधिक्य अधिक वाढले. मावळ दोनदा तर शिरूर तिनदा शिवसेनेकडे असून पुण्यात भाजपचे अनिल शिरोळे आणि बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये ’इनकमिंग’ सुरू असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळेस आपला राजकीय धूर्तपणा दाखवून पश्चिम महाराष्ट्रात तगडे उमेदवार देऊन भाजप-शिवसेनेला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळेस डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे तर मावळमध्ये शेवटच्या क्षणी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातील अस्वस्थता संपविली.

आढळराव-पाटील सलग तीन वेळा खासदार झाले. मात्र, त्यांच्यावर मतदारराजा मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. शिवसैनिकदेखील नाराज आहेत. शिवाय शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी भाजपमधील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या सभा, बैठकास उपस्थित राहत नाहीत. तर दुसर्यान बाजूला खुद्द आढळरावांनी राष्ट्रवादीचे कोल्हे यांची जात काढल्यामुळे त्यांना वेगळ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोल्हे यांनी ज्या तडफेने प्रचार सुरू केला आहे, त्यांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद यावरून आढळराव-पाटील यांना यावेळची निवडणूक म्हणजे तारेवरची कसरत अशीच म्हणावी लागेल. तीन वेळा जनतेने डोक्यावर घेतलेल्या आढळरावांना यावेळेस मात्र जनता डोक्यावरून आपटल्याशिवाय राहणार नाही, असा सूर शिरूर मतदारसंघात सर्वसामान्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 21 लाख 11 हजार 465 मतदार आहेत. सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आढळराव-पाटील यांनी 2014 च्या निवडणुकीत विजय मिळवित हॅट्रिक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल 3 लाख 1 हजार 453 मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना निकम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत मोदी यांच्या लाटेमुळे आढळराव-पाटील यांच्याही मताधिक्यात वाढ झाली. त्यांना 6 लाख 43 हजार 415 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मत मिळाली. मनसेचे अशोख खंडेभराड यांना 36 हजार मते मिळाली. जिल्हा परिषद आणि पाच तालुक्यांत राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना नेहमीच याठिकाणी आढळराव-पाटील यांना मतदारांनी साथ दिली आहे. यावेळेची निवडणूक मात्र राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या प्रश्नावर होणार आहे. त्यामुळे आढळरावांना यावेळेस आपल्या मतदारसंघातील जनेतेच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव असताना हा प्रभाव मोडीत काढून याठिकाणी शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले. भोसरी भाजपचे सहयोगी महेश लांडगे, हडपसर भाजपचे योगेश टिळेकर, शिरूर बाबुराव पाचर्णे, खेड-आळंदी शिवसेनेचे सुरेश गोरे, जुन्नर पूर्वी मनसेचे व आता शिवसेनेचे शरद सोनवणे आणि आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील निवडून आले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधनसभा सत्ताधारी पक्षाकडे आहेत. आंबेगाव विधानसभा फक्त राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत या सहाही विधानसभा मतदारसंघात आढळराव-पाटलांना मतदारांनी भरभरून मते दिली. मात्र, यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळे पाहयला मिळणार आहे. अनेक स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात आढळरावांनी जी खंबीर भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. चाकणचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला गेले. त्यामुळे चाकण व त्या परिसरातला विमानतळामुळे होणारा कायापालट, वाढणारा रोजगार, जमिनींना मिळणारे भाव आणि जगाच्या नकाशावर चाकणचे नाव कोरले गेले असते. यावर पाणी फिरल्यामुळे या परिसरातील लोकांचा रोष आढळराव-पाटलांवर आहे.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल असून यासंदर्भात त्यांनी ज्या पध्दतीने भूमिका घ्यायला हवी, ती न घेतल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी, पुणे-नाशिक महामार्गावरील चौपदरीकरणाचा प्रश्न, वाहतूक कोंडी, बेकारी, शेतीमालाला भाव नसणे आदी प्रश्नावर मोठी नाराजी आहे. दुसर्याच बाजूला ज्या मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नागरिक आणि व्यापार्यांतना झालेला त्रास, स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची उधळण, ’अच्छे दिन’चे गाजर, शेतकर्यांरच्या कर्जमाफीबाबत केंद्राने फिरवलेली पाठ, पेट्रोल, डिझेल, गॅसच्या सतत वाढत असलेल्या किंमती, 370 वे कलम रद्द करण्याची घोषणा, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी वाचाळपणाने केलेली वक्तव्ये या सर्व बाबींचा निवडणुकीवर परिणाम होणार. त्यामुळे आढळराव व त्यांच्या पक्षाचे नेते जनतेला काय उत्तर देणार, हा खरा प्रश्न आहे.

महापालिकेतील गैरकारभाराविषयी आढळराव-पाटील यांनी आवाज उठविला होता. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या विरोधातच आवाज उठविल्यामुळे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे समर्थक नगरसेवक, आढळराव पाटील यांचा प्रचार करतील की नाही, याची शाश्वती नाही. आढळराव यांनी भाजपवर केलेल्या आरोपासंदर्भात आपण राजकीय वक्तव्य केले होते. ते वक्तव्य मागे घेत आहोत, अशी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तरच भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील, असा सूर भाजपमधून ऐकावयास येत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी शिवसेनेने महापालिकेतील कारभारावर अनेकवेळा टीका व आंदोलने केली आहेत. त्यामुळे यावेळेस जरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभागी होण्यास कार्यकर्त्यांना सांगितले तरी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात मनोमीलन होईल की नाही याचीदेखील शंका आहे. सलग तीन वेळा आढळरावांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपली कामे केली नाहीत, अशी तक्रार कार्यकर्त्यांची आहे. शासनाच्या नुकत्याच काही समित्या जाहीर झाल्या. मात्र, भोसरीमधील कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे अनेकजण नाराज आहेत. एकंदरीतच ही नाराजी आढळराव-पाटील दूर कशी करणार हा मोठा प्रश्न आहे.

आढळराव-पाटील यांनी कोल्हे यांच्याबाबतीत जातीचा उल्लेख केल्यामुळे माळी समाजात मोठी नाराजी पसरली आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही यापूर्वी कधीही जातीवर राजकारण केले नाही. विकासकामावर चर्चा आणि आरोप झाले आहेत. मात्र, कोल्हे यांच्याबाबतीत त्यांच्या जातीचा उल्लेख केला. यावरून राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे, हे सांगण्याचा त्यांचा उद्देश असावा. कोल्हे कलाकार तर आहेतच. मात्र, यापूर्वी त्यांनी शिवसेनेत जिल्हा संपर्कप्रमुख अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांचे वक्तृत्त्वावर प्रभुत्व असल्यामुळे प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा त्यांना पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनसेचे शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आढळराव-पाटलांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. सोनवणे यांना यावेळेस जुन्नरकर कितपत पाठींबा देतील. कारण, माजी आमदार वल्लभ बेनके जरी राजकीय विजनवासात असले तरी त्यांचे आजही मतदारसंघात वजन आहे.

गेल्या वेळेस शिरूर तालुक्यातून शिवसेनेला चांगले मतदान झाले होते. याठिकाणी भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे आहेत. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. शिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे यावेळेस येथून आढळराव पाटलांना कितपत साथ मिळते. त्यावर त्यांचे मताधिक्य अंवलबून राहणार आहे. हडपसर विधानसभेमध्ये भाजपचे आमदार असले तरी राष्ट्रवादीचे कोल्हे यांना चांगले मतदान होईल, अशी चर्चा येथील मतदारांमध्ये आहे. कोल्हे यांच्या संभाजी मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिकेचा जनमानसावर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या मालिकेतील भूमिकेचाही त्यांना फायदा होणार आहे. दुसरी बाजू माजी आमदार विलास लांडे यांना सुरूवातीस शिरूर लोकसभा मतदारसंघातून कामाला लागा, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या. त्याप्रमाणे लांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामास लावले. बैठका, भेटीगाटी सुरू केल्या. आणि ऐनवेळेस कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लांडे यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली. लांडे नाराज झाले, अशी चर्चा वार्यालसारखी पसरली. वास्तविक लांडे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांना कोणतेही अमिष दाखविले तरी ते साहेब आणि दादांना सोडून जाणार नाहीत. कारण, यापूर्वी त्यांना शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या नेत्यांनी मोठी ऑफर दिली होती. मात्र, ती त्यांनी स्वीकारली नाही. यावरून साहेब आणि दादांवरची त्यांची निष्ठा लक्षात येते. नुकत्याच झालेल्या चिंचवड, भोसरी, जुन्नर या ठिकाणच्या सभेत साहेबांच्या उपस्थितीत आपण कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी आहोरात्र काम करणार आहोत. त्यामुळे कोणीही गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन केल्यामुळे त्यांनी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एकंदरीतच शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक ही एकतर्फी नसून आढळरावांच्या अस्तित्त्वाची आणि शिवसेनेच्या प्रतिष्ठेची असल्यामुळे शिवसेनेतून आलेले कोल्हे वेगळा इतिहास घडवेल असे वातावरण आजतरी दिसत आहे.”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content