HomeArchiveपोलखोल लातूर मतदारसंघाचा!

पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

Details
पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

    13-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने
atulm2001@gmail.com
लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे तिकीट कापून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे तर, काँग्रेसने मच्छिंद्र कामत याना तिकीट देत शृंगारे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. येथे बहुजन वंचित आघाडीने राम गरकार तर बहुजन समाजवादी पक्षाने सिध्दार्थ सुर्यवंशी यांना रिंगणात उतरवल्याने ही लढत रंगतदार झाली आहे. भाजपच्या वतीने विद्यमान खासदारांच्या विरोधात पक्षांतर्गत जोरदार विरोध असल्यामुळे विमान कर्मचारी मारहाण प्रकरणातील वादग्रस्त सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सर्वत्र सांगितले जात होते. परंतु हा बालेकिल्ला सहजपणे उद्ध्वस्त केला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने नियोजन केले होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरात सर्जिकल स्टाईक करून रूपा पाटील निलंगेकर यांना खासदार म्हणून निवडून आणले व काँग्रेसचे दिग्गज शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीच्या आणि शहकाटशहाच्या राजकारणातून भाजपाच्या सुनील गायकवाड यांचा निसटता पराभव झाला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत लातूरचा काँग्रेसचा गड जमिनदोस्त झाला.

यावेळी काँग्रेसला पुन्हा उभारी मिळणे अशक्यप्राय दिसत आहे. यामुळेच भाजपतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे तर मागील दोन तीन वर्षांपासून उमेदवारीच्या आशेने वेगवेगळया प्रकारची पक्षसेवा करीत होते आणि अखेर त्यांनी तिकीट मिळवल्याने भाजपतील अनेक जण नाराज झाले आहेत. तसेच विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा नाराज गट कोणती भूमिका घेतो यावर शृंगारे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या वंचित विकास आघाडीने उमेदवारी दिलेले राम गरकार मतदारसंघात फिरत असून त्यांनी आपला प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

भाजप आणि काँग्रेस यांनी आपले उमेदवार अगदी उशिरा जाहीर केल्याने आता प्रचाराची धार खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान असल्याने उमेदवारांना प्रचारासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळणार नाही. सध्या लातूर परिसरात कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आपला गेलेला बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार की भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार हे अनेक समीकरणांवर अवलंबून आहे. त्यात गटबाजी, नाराजी यांचा प्रभाव किती पडतो ते लवकरच समजेल.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content