HomeArchiveअभ्युदय बँकेचे अध्यक्ष...

अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट

Details
अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट

    28-Jun-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विकास सावंत, पत्रकार
vikassawant1968@gmail.com
सर्वसामान्य कष्टाळू माणसाला आर्थिक मदतीचा हात देत त्याला उभे करणारी बँक अशी अभ्युदय बँकेची ओळख आहे. या बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप घनदाट यांचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त व बँकेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुंबईतला टॅक्सीचालक, किरकोळ विक्रेता, फिरता विक्रेता, आशा पतहीन माणसांना पतवान बनवण्याची किमया अभ्युदय बँकेने केली आहे, म्हणूनच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरात जगभरातील अनेक मोठ्या व आंतरराष्ट्रीय बँका असल्या तरीही अभ्युदय बँकेने आपली ओळख कायम राखली आहे.

दोन लाखांहून अधिक सभासद असलेल्या या नामांकित बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप घनदाट याची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अभ्यासू युवा नेता, उत्तम प्रशासक व बँकिंग क्षेत्रातील उत्तम जाणकार अशी संदीपभाऊंची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे अभ्युदय बँकेच्या लौकिकात भर पडेल असा सभासदांचा विश्वास असून सहकार चळवळीत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, नूतन अध्यक्ष संदीप सीताराम घनदाट यांना बँकिंग क्षेत्रातील प्रचंड अनुभव आहे. सन 1999 पासून अभ्युदय बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. यापूर्वी 2004 ते 2009 या काळात अभ्युदय बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. देशभर बँकिंग व सहकार चळवळ अडचणीत असताना कसोटीच्या काळात संदीपभाऊंनी व्यावसायिक व्यवस्थापन करीत अभ्युदय बँकेला योग्य दिशा दिली व आर्थिक शिस्त लावून बँकेचा लौकिक कायम ठेवला आहे.
त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना अनेक आर्थिक संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा सदुपयोग करीत त्यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सन 2010 पासून ते मुंबई जिल्हा बँकेवर कार्यरत आहेत, या बँकेच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या “दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन”चे संचालक आहेत. तसेच मुंबईतील सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या “दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन”चे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्त्व असलेल्या संदीपभाऊंच्या निवडीची अभ्युदय परिवारात आनंद आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यात 111 शाखांचा विस्तार असलेली अभ्युदय बँक ही महाराष्ट्रातील प्रमुख मल्टिस्टेट बँक आहे.

16800 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय, 18 लाखांहून अधिक ग्राहक व ठेवीदार, 1300 कोटीहून अधिक भागभांडवल असलेली ही बँक संदीप यांच्या नेतृत्त्वाखाली नवी क्षितिजे पार करण्यास सज्ज झाली आहे. अभ्युदय परिवाराचे श्रद्धास्थान असलेले माजी आमदार, बँकेचे माजी अध्यक्ष व सहकार चळवळीतील दूरदृष्टी नेतृत्त्व सीताराम घनदाट मामांच्या सक्षम नेतृत्त्वाने बँकेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. मामांच्या नेतृत्त्वात बँकेने हजारो गोरगरिबांची घरे उभी केली आहे. त्यांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून हजारों ग्राहकांना स्वयंपूर्ण केले आहे. सीताराम घनदाट यांच्या विचाराचा व कर्तृत्त्वाचा वारसा असलेल्या संदीप घनदाट यांना दुसऱ्या वेळेस सभासदांनी एकमुखाने बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान केले आहे. सन 1965 साली 5 हजार रूपये भागभांडवलावर सुरू झालेल्या या बँकेचे आज 1300 कोटींपेक्षा अधिक भागभांडवल आहे. बदलत्या आर्थिक व जागतिक परिस्थितीत बँक सक्षमपणे प्रगती करेल असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष संदीप घनदाट यांनी व्यक्त केला आहे.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content