HomeArchiveकलम ३७० रद्द;...

कलम ३७० रद्द; मुंबई भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Details
 
 
 
 
 
केएचएल ब्युरो
hegdekiran17@gmail.com 
 
“देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकांनी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० व ३५-अ हटवल्याचे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जबरदस्त स्वागत केले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या या निर्णयाचे लोकांमध्ये मिठाई वाटून स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी लोढा म्हणाले की, मोदीजी आणि अमित भाईंनी आपल्या दृढनिश्चय शक्तीचा परिचय देत एक अत्यंत साहसी निर्णय घेतला आहे.”
 

“मुंबईमधील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरूवात “”जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है”” चा नारा देत शामाप्रसाद मुखर्जी यांना पुष्पहार अर्पण करून झाली. मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह आमदार तमिल सेलवन, भाई गिरकर, आमदार राज पुरोहित, अतुल शाह, शायना एनसी यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जम्मू-काश्मीर अनुच्छेद ३८० व ३५-अ हटवण्याचा निर्णय, तसेच जम्मू-काश्मीर व लडाख वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्यासहित अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आपसात मिठाई वाटून, एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिंदाबादचे नारे लगावत जल्लोष साजरा केला. यावेळी राजकीय कार्यकर्त्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
 
 
 
 
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

साहसी खेळाशी संबंधित आज चर्चासत्र
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/14/Today-s-seminar-on-adventure-sports.html
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content