HomeArchiveसाहसी खेळाशी संबंधित...

साहसी खेळाशी संबंधित आज चर्चासत्र

Details
 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महा अॅडव्हेन्चर कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आज म्हणजेच १३ ऑगस्टला साहसी खेळाशी संबंधित एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात कौन्सिलची गरज, विनास्पर्धक स्वरूप, लोकसहभागाची आवश्यकता आदी विषयांवर चर्चा होणार असून महाराष्ट्र शासनाच्या वन संरक्षक विभागाचे मुख्य सचिव एन. एच. काकोडकर, जयराज साळगावकर, वसंत लिमये आणि के. सरस्वती हे मान्यवर यात सहभागी होणार आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे सायंकाळी साडेसहा वाजता हे चर्चासत्र होईल. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”

 
 
 
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/14/Cruiseship-from-Garden-Reach-for-nation.html
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content