Details
“मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने बालकोटस्थित दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्यावेळी झालेल्या डॉग फाईटमध्ये विमान कोसळून वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने बंदी बनवले. पण, वेळेत त्यांना अँटी जॅमिंग तंत्र सुरू करण्याचा संदेश मिळाला असता तर ते विमान अपघातग्रस्तही झाले नसते आणि कोसळून बंदी बनले नसते. ही एकच चूक पुढील नुकसानीला कारणीभूत ठरली. अभिनंदन यांना वीरचक्र आणि स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्धसेवा पदकाने उद्या सन्मानित केले जाईल.”
“भारताने २६ फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईकने चढवलेल्या हल्ल्याला पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवशी एफ १६ ने कारवाई केली. ते आपण पाडलेच. पण, आपले ही मिग २१ बायसन पडून वैमानिक अभिनंदन कैदी बनले. वास्तविक पाहता मिग २१ हे अँटी जॅमिंग तंत्राने युक्त असे लढाऊ विमान आहे. वैमानिक हे तेव्हाच चालू करतो जेव्हा त्यासाठी त्याला संदेश मिळतो. मात्र, पाकिस्तानी वैमानिकाला हा आदेश मिळाल्याने त्याने त्याचा तत्काळ फायदा उचलत मिगवर हल्ला चढवला आणि ते पाडले. अभिनंदन यांना मागे फिरण्याचा संदेशदेखील मिळाला नाही. यावरून आपण तंत्रज्ञान असून ते वापरण्यात कमी पडलो, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले. लढाऊ विमानांच्या समोरासमोरील लढाईला डॉग फाईट असे म्हणतात.
भारतीय वायू सेनेने दीर्घ कालावधीपासून म्हणजे २००५ सालीच या तंत्राला अधिक प्रगत बनविण्यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती. वेळेतच ‘डेटा लिंक’ नावाचं तंत्रज्ञान मिळालं असतं तर दुश्मन देशाचं तंत्र विफल करता आलं असतं. मात्र, आता या म्हणण्याला काही अर्थ नाही असं मत सूत्रांनी व्यक्त केलं. ”
“यामुळे हवाई दलाने २००८- २०१२ या काळात उपलब्ध संचारयंत्रणेचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करीत त्याच्या खरेदीचा आग्रह धरला. २०१३ मध्ये पंजाबातील हलवारे हवाई तळावर याचं परीक्षणदेखील झालं. त्याचवेळी डी.आर.डी.ओ. आणि भारत इलेक्ट्रॉनिक लि.ने याची निर्मिती सुरू केली. पण, वायुसेनेच्या चाचणीत ते कसोटीवर आणि मागणीनुसार नव्हते. कारण ते इतके मोठे होते की लढाऊ विमानाच्या कमी जागेत बसविणे शक्य झाले नाही. त्यानंतर पुढील दोन वर्षे मागणी होत राहिली. विदेशात बनवलेल्या अँटी जॅमिंगची खरेदी का करावी असे प्रश्न प्रशासन करीत राहिले. अखेर २०१७ मध्ये वायुसेनेला खरेदीची मंजुरी देण्यात आली. मात्र, ते ताब्यात येण्यापूर्वीच बालकोट एअरस्ट्राईकची घटना घडली. असं सांगितलं जातं. ”
“पाकिस्तान वायुसेनेने भारतीय सैन्य तळांना लक्ष्य करण्यासाठी हल्ला चढवला. पण, आपलं हवाई दल सतर्क असल्याने ते शक्य झाले नाही. उलट आपण त्यांचे एफ १६ पाडण्यात यशस्वी झालो. आता काश्मीरमधून ३७० कलम हटविल्याने शेजारी आक्रमक भूमिकेत आलाय. आपणही तयार असल्याची गर्जना लष्करप्रमुख रावत यांनीही केलीय. सप्टेंबरमध्ये बहुचर्चित राफेल दाखल झाल्यावर आपल्या बळात अजून वाढ होईल.”
“दरम्यान, या बहादुरीसाठी अभिनंदन यांना सैन्यातील तिसऱ्या सर्वोच्च पदकाने सन्मानीत करण्यात येईल. परमवीर चक्र, महावीर चक्रनंतर वीर चक्र अशी यांची उतरंड आहे. मिंटी यांना डॉग फाईटच्या वेळी उत्तमप्रकारे विमान नियंत्रण कार्याबद्दल पदक दिले जाणार आहे. ”
“एअर स्ट्राईकमध्ये इस्रायलनिर्मित स्पाईस २००० बॉम्ब वापरत जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात तीनशेहून अधिक दहशतवादी मारले, तर १४ फेब्रुवारीच्या पुलावामा येथील सी.आर.पी.एफ काफिल्यावरील हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यावरुन मोठी तणातणी झाली होती. अखेर, कूटनिती वापरल्याने अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली.”
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ज्ञानदा नेवगी ठरली सिनसिनाटी विद्यापीठ शिष्यवृत्तीची मानकरी
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/26/Dyanda-Nevgi-gets-University-of-Cincinnati-Scholarship-.html

