Details
श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि मिलाग्रीस हायस्कूलची माजी विद्यार्थिनी ज्ञानदा दीपक नेवगी ही अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे.
ज्ञानदा हिने मुंबई येथील कमला रहेजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी संपादन केल्यानंतर तिने सिनसिनाटी विद्यापीठातून अर्बन प्लॅनिंग विषयात मास्टर ऑफ आर्किटेक्चर या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. त्याच दरम्यान तिला सिनसिनाटी विद्यापीठाने सदर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती व असिस्टंटशिप देण्यात आल्याचे कळविले.
या मास्टर डिग्रीच्या अभ्यासक्रमासाठी ज्ञानदा अलीकडेच अमेरिकेला रवाना झाली आहे. ज्ञानदा हिने यापूर्वी दहावीच्या परीक्षेत १०० % मार्क मिळवून जिल्ह्यात नवा इतिहास रचला होता. तिने रायफल शूटिंग स्पर्धांमधून अनेक पदके मिळवत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही तिचे विशेष अभिनंदन केले.
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेरिकन ‘अपाचे’ होणार पुढील महिन्यात भारतीय वायुसेनेत दाखल!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Article-on-Apache-helicopter-from-Vinay-Khare-.html

