HomeArchiveराज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा...

राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा संपन्न!

Details
 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“सालाबादप्रमाणे ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे पार पडली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील संघ तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी आर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.”
 
 
या स्पर्धेत टीम ऑफ फोर गटात मान्यवर ब्रीज क्लब विजेते ठरले असून मामा वैद्य चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन दुसरा तर आमनोरा क्लबने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पेअर्स गटात राजू गुळवणी आणि धाक्रस यांनी बाजी मारली त्यांना मोहन गुप्ते स्मृती चषक व रोख पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत पेअर्स प्रकारात अवघ्या वर्षे वयाच्या तीर्थराज याने उत्कृष्ट खेळ करत सगळ्यांचे लक्ष वेधले. सुकृत विजयकर स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता आर्य क्रीडा मंडळ तसेच इतर अनेकांचे सहकार्य लाभले.

 
 
 
 
 
 
 

 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content