HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकाची...

स्वा. सावरकर स्मारकाची चित्रकला स्पर्धा!

Details

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 

“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण स्मृतिवर्षानिमित्त लहानग्यांना आणि तरूण पिढीला डोळ्यासमोर ठेऊन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२० यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे होणार आहे. मुंबई आणि राज्यभरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.”

“स्पर्धाप्रमुख विज्ञानेश शंकर मासावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यस्तरीय स्पर्धा होत असून शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागाचे प्रमाणपत्रही प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येईल. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शालेय, महाविद्यालय आणि खुल्या गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा घेतली जाईल.”

“‘चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, विज्ञान-तंत्रज्ञान-इतिहास यातून चित्रकला साकारुन तेजस्वी राष्ट्रभक्तीला प्रेरणा मिळावी, यासाठी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना सहभागी करुन त्यांच्या कौशल्याला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे.’, असे स्पर्धा प्रमुख मासावकर यांनी सांगितले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी मयुरेश आंबेडे- ९७७३३५४१८५, सागर पाटील- ९८१९००६७६४, नरेश जंबुकर- ९८७००२०५०० या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी, विषय, नियम व अधिक माहितीसाठी https://www.savarkarsmarak.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content