HomeArchive५७ टक्के विद्यार्थ्यांद्वारे...

५७ टक्के विद्यार्थ्यांद्वारे ऑनलाईन मंचाचा वापर

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सुमारे ५७% विद्यार्थी विविध ऑनलाईन मंचांचा वापर शिकण्यासाठी करत असल्याचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाइन कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेसबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.”
 
भारतातील २०००हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या या सर्वेक्षणात ५७% विद्यार्थी सध्या ऑनलाईन मंचाचा वापर करत असल्याचे आढळून आले तर यापैकी ५३.७% विद्यार्थ्यांनी हे क्लासेस चांगले वाटत असल्याचेही सांगितले. सहभागींपैकी ५९.४% विद्यार्थ्यांनी या विश्रांतीच्या काळात गृहपाठही दिला जातोय असेदेखील नमूद केले.
 
“शाळा त्यांच्या अधिकारानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण विना अडथळा आणि अखंड व्हावे, यासाठी प्रयत्न करत असून ४६.९% विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस घेताना त्यांना शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनाची आठवण येते असे म्हटले तर ४६.९% विद्यार्थ्यांनी घरी कंटाळवाणे होत असल्याचे सांगितले. तसेच ४५.४% विद्यार्थी त्यांच्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवतात, असे या सर्वेक्षणात दिसून आले.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content