HomeArchiveलॉकडाऊन वाढण्याच्या बातमीने...

लॉकडाऊन वाढण्याच्या बातमीने शेअर बाजारात घसरण

Details
 
 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
मागील आठवड्यात चांगला परफॉर्मन्स दाखवणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने सोमवारी मात्र फारशी चांगली कामगिरी केली नाही. सेन्सेक्स 1.5 टक्क्यांनी आणि ४६९ अंकांनी गडगडला तर एनएसईमध्ये निफ्टी ५० देखील १.३% नी घसरला व ९ हजार अंकांवर थांबला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन वाढले असताना तसेच देशांतर्गत रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मार्केटचा कलही प्रभावित होत असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले.
 
“बीएसईचे ३० स्टॉक बेंचमार्क निर्देशांकात आज फक्त ७ स्टॉक्समध्ये प्रगती झाली. यात एल अँड टी, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचा समावेश आहे. भारती एअरटेल आणि एशियन पेंट्ससारख्या स्टॉक्सनी नुकत्याच झालेल्या सुधारणेनंतर अनुक्रमे ४.६४% आणि १.६३% ची वाढ घेतली. निफ्टी ५० मध्ये २० शेअर्समध्ये प्रगती तर ३० शेअर्समध्ये घसरण दिसून आली. उपरोक्त शेअर्सव्यतिरिक्त हिंडाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स एसईझेड आणि कोल इंडिया यांनी आज वाढ अनुभवली. डॉ. रेड्डीज लॅबदेखील ३.८२%च्या वृद्धीच्या मार्गावर होती. मार्च महिन्यातील नीचांकीच्या तुलनेत हा स्टॉक ४०%हून अधिक आहे.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content