HomeArchiveआता घरीच करा...

आता घरीच करा घरगुती उपकरणांची दुरूस्ती

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
लॉकडाऊनदरम्यान घरातील उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरूस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन २४७ अराऊंड या अग्रगण्य उपकरण सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन सुरू केली आहे. याद्वारे कंपनीचे घरून काम करणारे तंत्रज्ञ ग्राहकांना व्हॉट्स एप तसेच गूगल मीट व्हिडिओद्वारे मदतीसाठी तत्काळ उपलब्ध असतील. उपकरणांच्या दुरूस्तीकरिता ते ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल.
 
“लॉकडाऊन असल्यामुळे बिघडलेली उपकरणे दुरूस्त करण्यासाठी बाहेर नेणे शक्य नाही तसेच तंत्रज्ञही घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे २४७ अराऊंडची ही सुविधा ग्राहकांकरिता उपयुक्त ठरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञ (टेक्निशिअन्स) उच्च प्रतीचे कौशल्यप्राप्त, अनुभवी आणि तंत्राचे दुरून निदान करण्यात प्रशिक्षित आहेत. या तंत्रज्ञांच्या साहाय्याने ग्राहकांना रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर्स, एसी, वॉशिंग मशीन, गॅस बर्नर इत्यादी उपकरणे दुरूस्त करण्याकरिता ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल.”

 
“या सुविधेमागील उद्द्येश स्पष्ट करताना २४७ अराऊंडचे सीईओ आणि सहसंस्थापक नितीन मल्होत्रा म्हणाले की, या क्षेत्राला दर ३० दिवसांत २५ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक उत्पादने दुरूस्त करण्याची मागणी असते. त्यामुळे सध्या अनेक लोक त्रस्त आहेत. यापैकी गॅस बर्नर, वॉटर प्युरिफायर, एसी, वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर ही लोकप्रिय उपकरणे आम्ही ऑनलाईन दुरूस्त करत आहोत. व्हिडिओद्वारे दुरूस्तीचे प्रमाण सध्या २५ ते ३० टक्के आहे. आम्ही काही प्रमाणात ग्राहकांची अडचण दूर करण्यात सक्षम ठरत आहोत याचे आम्हाला समाधान आहे.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content